पंढरपूर, 18 ऑक्टोबर: कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील काही भागात परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं केलं आहेय. राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, 19 ऑक्टोबरला सोलापूर जिल्ह्यातील नुकसाग्रत भागाचा दौरा करणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीलर रयत क्रांती संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतातील उभं पीक आडवं झाल्याचं पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. मंत्र्यांनी पाहणी दौरे करून ही कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक भोसले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...जरा पहा ना ठाकरे साहेब, शेतकरी मरणाच्या दारात... VIDEO पाहून तुम्ही व्हाल भावुक
नुकसानग्रस्त भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 1 लाख रुपये मदत तात्काळ डिपॉझिट करा, नंतर पंचमाने करून उर्वरित रक्कम द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे. मदत मिळाली नाही तर कोणत्याही मंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात फिरकू देणार नाही, अशा इशारा देखील दिला आहे.
फक्त टूर सारखे दौरे करू नका. येत्या दोन दिवसात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख रुपये मदत जमा नाही केली. तर कोणत्याही मंत्र्यांना, आमदार, खासदारांना किंबहुना मुख्यमंत्र्यांनाही सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा दीपक भोसले यांनी सरकारला दिला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असताना मुख्यमंत्र्यांना घर सुटेना! अशी खोचक टीका भाजपकडून होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृतीतून उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी (19 ऑक्टोबर) मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित रहाणार आहेत.
मुख्यमंत्री 19 ऑक्टोबरला राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहाणी करणार आहेत. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण करतील. सोलापूरहून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्द येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. बोरी उमरगे येथील पाहाणी केल्यानंतर मुखमंत्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तसेच अभ्यागताच्या भेटी घेतील. सायंकाळी सोलापूरहून विमानानं मुंबईकडे रवाना होतील.
हेही वाचा...जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, समोर आली डोकं सून्न करणारी माहिती
असा असणार मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तं भागांचा दौरा...
दिनांक 19.10.2020
सकाळी 08:00 वा.-सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण
सकाळी 09:00 वा.-सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण (8 कि.मी.)
सकाळी 09:15 वा.-शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव
सकाळी 09:30 वा.-सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) (50 कि.मी.)
सकाळी 10:45 वा.- सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11:00 वा.- सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी
सकाळी 11:15 वा.- अक्कलकोट शहरकडे प्रयाण (7 कि.मी.)
सकाळी 11:30 वा.- अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी
सकाळी 11:45वा.- अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण (5 कि.मी.)
दुपारी 12:00 वा. - रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:15 वा.- रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण (05 कि.मी.)
दुपारी 12:30 वा.- बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:45 वा.- बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण (60 कि.मी.)
दुपारी 02:00 वा.- शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव
दुपारी 03:00 वा.- पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी
दुपारी 03:30 वा.- शासकीय विश्रामगृह येथून सोलापूर विमानतळाकडे प्रयाण
दुपारी 03:45 वा.- सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण
सायं. 05:00 वा.- मुंबई विमानतळ येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण