एसटी महामंडळ 'बंद'मुळे झालेलं आर्थिक नुकसान सोसणार - रावते

एसटी महामंडळ 'बंद'मुळे झालेलं आर्थिक नुकसान सोसणार - रावते

भीमा कोरेगाव हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये गेल्या ३ दिवसांत एसटीचं एकूण २० कोटींचं नुकसान झालं.

  • Share this:

05 जानेवारी : भीमा कोरेगाव हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये गेल्या ३ दिवसांत एसटीचं एकूण २० कोटींचं नुकसान झालं. मात्र ही भरपाई आंदोलकांकडून नुकसान भरपाई घेणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिलीय.

तोडफोडीत एसटी बसेसचं १ कोटींचं नुकसान झालंय, तर १९ कोटींचा महसूल बुडालाय.  मात्र हे नुकसान एसटी महामंडळ सोसणार असल्याचं रावतेंनी म्हटलंय.

तर बेस्ट बस प्रशासनानं नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडे मागितलीय. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी ही मागणी केलीय.

महाराष्ट्र बंद काळात एसटींची तोडफोड झाली. बऱ्याच गावात एसटी सेवा बंद ठेवण्यात आलेली. तर शहरात बेस्टच्या 48 बसेसचं नुकसान झालेलं. 4 कर्मचाऱ्यांना काचाही लागलेल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2018 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading