मनसे आणि भाजप युतीच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची सावध प्रतिक्रिया

मनसे आणि भाजप युतीच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची सावध प्रतिक्रिया

मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोपनीय भेट झाली होती.

  • Share this:

जालना, 11 जानेवारी : राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात ही त्याच स्वरूपाची भेट असल्याची सावध प्रतिक्रिया देत केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे जालनाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी मनसे आणि भाजप युतीच्या प्रश्नाला बगल दिली.

मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोपनीय भेट झाली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे आणि भाजप युती होण्याच्या चर्चांना वेग आला होता. दरम्यान, मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करीत भगवा आणि शिवराजमुद्राचा वापर करून नवीन झेंडा हाती घेण्याच्या चर्चेने मनसे भाजप युतीच्या चर्चेला अधिकच बळ दिलं होतं. दरम्यान,जालन्यात पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी आज मनसे भाजप युतीच्या प्रश्नावर अतिशय सावध प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेटही इतर राजकीय नेत्यांसारखीच होती, असं दानवेंनी सांगितलं.

हे सरकार जनतेच्या विकासासाठी नव्हे तर हे सरकार स्थगिती सरकार

भारतीत जनता पक्षाने या राज्याच्या विकासासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना आणल्या होत्या. पण, या सरकारने त्याला स्थगिती दिली. हे सरकार जनतेच्या विकासासाठी नव्हे तर हे सरकार स्थगिती सरकार असल्याची सडकून रावसाहेब दानवेंनी केली.

'CAA हा नागरिकत्व देणारा कायदा'

दरम्यान, दानवेंनी CAA आणि NRC विरोधप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. 'CAA हा नागरिकत्व देणारा कायदा आहे नागरिकत्व काढणारा नाही. यामुळे अल्पसंख्याक समाजाने घाबरण्याचे कारण नाही', असं दानवे म्हणाले.

दानवेंच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

नगरसेविका संध्या संजय देठे यांच्यावतीने शहरातील प्रभाग क्र. 22 आणि 23 मधील गुणवंत प्रज्ञावंतांच्या गूण गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत प्रज्ञावंतांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर हे होते. यावेळी सुमारे 150 गुणवंतांना शाळ,श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 07:56 PM IST

ताज्या बातम्या