30 मार्च : शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड विमान आणि रेल्वे मार्गानंतर आता रस्ते मार्गाने दिल्लीत दाखल झाले आहेत. गायकवाड यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी तयारी सुरू केली आहे.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रवींद्र गायकवाड याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.