मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ravikant Tupkpar यांच्या गाडीची दुचाकीला धडक, दोन युवक गंभीर जखमी

Ravikant Tupkpar यांच्या गाडीची दुचाकीला धडक, दोन युवक गंभीर जखमी

रविकांत तुपकर यांच्या गाडीची दुचाकीला जोरदार धडक, दोन जण गंभीर जखमी

रविकांत तुपकर यांच्या गाडीची दुचाकीला जोरदार धडक, दोन जण गंभीर जखमी

Ravikant Tupkar vehicle hits bike rider: रविकांत तुपकर यांच्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जखमी झाले आहेत.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 23 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी (two injured seriously) झाले आहेत. ही घटना बेराळा फाट्याजवळ घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले होते. बेराळा फाट्याजवळ (Berala phata) भरधाव जात असलेल्या त्यांच्या वाहनासमोर रस्ता क्रॉस करताना दुचाकी घेऊन अचानक दोन युवक आले. (Ravikant Tupkar car hits bike rider at Berala phata near Chikhali)

दुचाकीचा वेग खूप जास्त असल्याने मोटर सायकल नियंत्रित करण्यात चालकांना अपयश आले. परिणामी दोन्ही वाहनाची जबर धडक झाल्याने दुचाकीवर बसलेल्या दोन्ही युवकांना गंभीर मार लागला. रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा वेगही अधिक होता घटनेनंतर लगेच जखमी युवकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र दोन्ही युवकांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.

रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संखटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आता रविकातं तुपकरांनी 20 नोव्हेंबर रोजी स्थगित (Ravikant Tupkar hunger strike ends) केले. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलस्थळी भेट दिली. यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी रविकांत तुपकर यांच्यासोबत चर्चा करत हे आंदोलन स्थगित करा आणि येत्या बुधवारी मंत्रालय येथे बैठक लावून चर्चा घडवून तोडगा काढू असं आश्वासन दिले. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा : रविकांत तुपकरांच्या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवली, VIDEO

बैठकीत तोडगा निघाला नाही तर...

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाने राज्यभर हिंसक वळण घेत असल्याने शासनाने त्यांच्या अन्नत्याग उपोषणाची दाखल घेत त्यांना आश्वस्त केलं. यानंतर रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थगित केलं. पण बुधवारी होणाऱ्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर पून्हा उग्र आंदोलन करू असा ठाम निर्णय तुपकरांनी घेतला आहे.

काय आहेत मागण्या?

बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अचानक एकत्र येत सडलेले सोयाबीन जाळून आंदोलन केलं. सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून अतिवृष्टीग्रस्तांना 50 हजार रुपये मदत देण्यात यावी, सोयाबीनचा प्रति क्वि. दर 8 हजार रुपये व कापसाचा प्रति क्वि. दर 12 हजार रु.स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, ओला दुष्काळ जाहीर करा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

First published:

Tags: Accident, Buldhana news