आघाडीचा चेंडू आता थेट पवारांच्या कोर्टात, स्वाभिमानीचे तुपकर भेटीला

आघाडीचा चेंडू आता थेट पवारांच्या कोर्टात, स्वाभिमानीचे तुपकर भेटीला

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीची स्वाभिमान शेतकरी संघटनेसोबत आघाडीबाबत बोलणी सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 फेब्रुवारी : आघाडीतील तिढा सोडवण्यासाठी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चा करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीत रविकांत तुपकर स्वाभिमानीला लोकसभा निवडणुकीत हव्या असणाऱ्या जागांबाबत पवारांना माहिती देतील.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीची स्वाभिमान शेतकरी संघटनेसोबत आघाडीबाबत बोलणी सुरू आहेत. मात्र अद्याप जागावाटपाबाबात तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता यामध्ये थेट शरद पवारांनी लक्ष घातल्याचं चित्र आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माढ्यात एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मतदारसंघातून शरद पवार हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपसोबत या मतदारसंघात स्वाभिमानीचंही आव्हान निर्माण होऊ नये म्हणून पवार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात पक्षाची तब्बल पाच तास गुप्त बैठक झाली होती. स्वाभिमानी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काय झालं बैठकीत?

राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत बैठक

बैठकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय

बुलडाणा, वर्धा मध्ये स्वाभिमानी उमेदवार देणार

त्या 27 तारखेला माढ्यामध्ये एल्गार मेळावा

28 तारखेला राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात होणार

राजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड झाल्याची शक्यता

कोल्हापूरमधील हॉटेलमध्ये रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत बैठक

बुलढाणा, वर्धा जागेवर स्वाभिमानी संघटना ठाम

VIDEO : सरकारने दिलं काय? शहिदांच्या मुद्द्यावर उदयनराजे संतापले

First published: February 25, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading