मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, "बुधवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर..."

Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, "बुधवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर..."

रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, "बुधवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर..."

रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, "बुधवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर..."

Ravikant Tupkar hunger strike ends: रविकांत तुपकर यांनी सुरू केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 20 नोव्हेंबर : कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संखटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आता रविकातं तुपकरांनी स्थगित (Ravikant Tupkar hunger strike ends) केले आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलस्थळी भेट दिली. यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी रविकांत तुपकर यांच्यासोबत चर्चा करत हे आंदोलन स्थगित करा आणि येत्या बुधवारी मंत्रालय येथे बैठक लावून चर्चा घडवून तोडगा काढू असं आश्वासन दिले. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठकीत तोडगा निघाला नाही तर...

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाने राज्यभर हिंसक वळण घेत असल्याने शासनाने त्यांच्या अन्नत्याग उपोषणाची दाखल घेत त्यांना आश्वस्त केलं. यानंतर रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थगित केलं. पण बुधवारी होणाऱ्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर पून्हा उग्र आंदोलन करू असा ठाम निर्णय तुपकरांनी घेतला आहे.

सोयाबीनला 8 हजार रुपये तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी रविकांत तुपकर करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे हे आंदोलन सुरू होते. तर रविकांत तुपकर यांच्या आईने प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, माझ्या मुलाने अन्नाचा एकही कण खालेल्ला नाहीये. तो शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे त्याच्या तब्येतीचं जर काही बरे वाईट जाले तर त्याची जबाबदारी ही सरकारची असेल.

शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवली

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे संतप्त झालेल्या समर्थक आणि शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवून दिली. मागील 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. पण आज तुपकरांची प्रकृती खालावली. तुपकरांची प्रकृती खालवल्याने शेतकरी व कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी बुलडाणा तहसीलदार यांची गाडी पेटवून दिली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रवीकांत तुपकरांची प्रकृती खालावली असतांना त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतल्या जात नाही त्यामुळे सरकारला किती बळी पाहिजेत म्हणत स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची मुंबईकडे कूच; टोलनाक्यावर गाड्या अडवून कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

काय आहेत मागण्या?

बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अचानक एकत्र येत सडलेले सोयाबीन जाळून आंदोलन केलं. सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून अतिवृष्टीग्रस्तांना 50 हजार रुपये मदत देण्यात यावी, सोयाबीनचा प्रति क्वि. दर 8 हजार रुपये व कापसाचा प्रति क्वि. दर 12 हजार रु.स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, ओला दुष्काळ जाहीर करा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

First published:

Tags: Farmer protest, महाराष्ट्र