Home /News /maharashtra /

रावेर लोकसभा निवडणूक : रक्षा खडसेंसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपला पुन्हा यश मिळणार का?

रावेर लोकसभा निवडणूक : रक्षा खडसेंसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपला पुन्हा यश मिळणार का?

    रावेर, 14 मे : उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उल्हास पाटील निवडणूक लढवत आहेत. रावेरची ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली आणि माजी खासदार उल्हास पाटील यांना तिथून उमेदवारी देण्यात आली. रावेरच्या जागेवर भाजपचं चांगलं वर्चस्व आहे. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांची सून आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेची आहे. 2014 मध्ये रक्षा खडसेंचा विजय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंचा विजय झाला होता. रक्षा खडसेंना 6 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष जैन इथे 2 लाख 87 हजार 384 एवढीच मतं मिळवू शकले. 2009 च्या निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ जावळेंचा विजय झाला होता. सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय झाल्यामुळे भाजप याही वेळी यश मिळवणार का याची चर्चा आहे. भाजप - शिवसेनेचं वर्चस्व रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांवर भाजप - शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. याचा फायदा याही निवडणुकीत रक्षा खडसेंना मिळू शकेल. तरुण खासदार होण्याचा मान रक्षा खडसे यांनी 2010 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्या रावेरमधून खासदार म्हणून निवडून आल्या तेव्हा त्या फक्त 26 वर्षांच्या होत्या. त्यामुळे हीना गावित यांच्याप्रमाणेच लोकसभेच्या तरुण खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. आता पुन्हा एकदा रक्षा खडसे विजय मिळवून हॅटट्रिक करतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. ======================================================================= VIDEO : EVM बद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात चाललंय काय? अजितदादा असं का बोलले?
    First published:

    Tags: Lok sabha election 2019, Raksha khadse

    पुढील बातम्या