'शेवंता' फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा आक्षेपार्ह उल्लेख, कार्यक्रमावरून पिंपरी चिंचवडमध्ये वाद

'शेवंता' फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा आक्षेपार्ह उल्लेख, कार्यक्रमावरून पिंपरी चिंचवडमध्ये वाद

जाहिरात विभागाने दिलेल्या एका जाहिरातीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 4 मार्च : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जाहिरात विभागाने दिलेल्या एका जाहिरातीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेच्या उदघाटन प्रसंगी अनेक मान्यवरांसोबत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे, मात्र त्यांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या नावापुढे करण्यात आलेल्या उल्लेखावरून उलट-सुटल चर्चा सुरू झाली आहे.

पवनाथडी जत्रेच्या उदघाटन प्रसंगी येणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांचा विशेष आकर्षण असा उल्लेख करण्यात आला आहे. जाहिरात विभागा मार्फत केल्या गेलेला हा उल्लेख आक्षेपार्ह आहेच, शिवाय महिलांविषयी असलेल्या विकृत मानसिकतेचं दर्शनही घडविणाराही आहे, असा आरोप आता करण्यात येत आहे.

महापालिकेचं महापौर पद एक महिला भूषवत असताना देखील महिलांबाबत अशी जाहिरातबाजी करून अकलेचे तारे तोडणाऱ्या महापालिकेच्या जाहिरात विभागाचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशी प्रतिक्रिया आता समोर येत आहे. दरम्यान या उल्लेखा बाबत अपूर्वा नेमळेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रतिक्रिया न देता निघून गेल्या.

हेही वाचा- ट्रिपल सीट आणि हातात सुरा... लुटमारीचा नवा पॅटर्न राबवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुसरीकडे, पिंपरी महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी या जाहिराती बाबत आक्षेप नोंदवीत ही प्रशासनाची चूक असल्याचं म्हटलं आहे. असा उल्लेख करण्या ऐवजी प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख केला असता तरीही चाललं असतं, असं म्हणत ढोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

First published: March 4, 2020, 9:44 PM IST

ताज्या बातम्या