EXCLUSIVE: जालन्यात 'रात्रीस खेळ चाले..' आपोआप लागे आगsss

EXCLUSIVE: जालन्यात 'रात्रीस खेळ चाले..' आपोआप लागे आगsss

एका घरातील बाळाच्या पाळण्याने अचानक पेट घेतला. सुदैवाने त्यावेळी पाळण्यात बाळ नसल्याने पुढील अनर्थ टळला.

  • Share this:

विजय कमळे पाटील, (प्रतिनिधी)

जालना, 27 एप्रिल- सारवाडी गावात एक अजबगजब प्रकार पाहायला मिळतोय. गेल्या 15 दिवसांपासून गावात ठिकठिकाणी आपोआप आग लागण्याचे सत्र सुरु आहे. कपडे, धान्य, पशुखाद्य, भांडी यासारख्या जीवनोपयोगी वस्तू जळतात. एवढंच नाही तर पाळण्याला अचनाक आग लागते. या आगीचं नेमकं कारण अद्याप उलगडू शकलं नसलं तरी भानामतीसारखा जादूटोणा किंवा करणी केल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याची अंधश्रद्धेने गावकऱ्यांच्या मनात घर केले आहे. संपूर्ण गावात भीतीचं सावट पसरलंय.

सारवाडी...जालना शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंसं गाव. जेम तेम 1000 लोकसंख्या. गेल्या 15 दिवसांपासून या गावात एक अजबच प्रकार घडतोय. सर्वप्रथम गुडीपाडव्याच्या दिवशी गावातील लिंबाच्या झाडाला बांधून ठेवलेल्या शेतातील पाईपने अचानक पेट घेतला. उन्हामुळे किंवा दुसऱ्या काही कारणाने आग लागली असावी,  असं म्हणत गावकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, त्यादिवशीपासूनच गावात कुठे ना कुठे तरी अशाप्रकारे आग लागण्याची घटना घडत आहे. कुणाच्या घरातील कपडे, अंथरून, धान्य जळतंय तर कुणाच्या शेतातील कडबा जळून खाक होतोय. एवढंच नव्हे तर घरातील भाजीपाला आणि किराणा माल पेट घेतो.

2 दिवसापूर्वी एका घरातील बाळाच्या पाळण्याने अचानक पेट घेतला. सुदैवाने त्यावेळी पाळण्यात बाळ नसल्याने पुढील अनर्थ टळला. काळ तर हद्दच झाली. अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आलेल्या एका तरुणीच्या अंगावरील ओढणीला अचानक आग लागली. सदर प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ ती विझविली. याप्रकारामुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरलेले असून त्यांची रात्रीची झोप देखील उडालीय. आगीच्या भीतीने गावकरी रात्रीच्या वेळेस आळीपाळीने गावात गस्त घालत असतात.

SPECIAL REPORT : लाव रे तो व्हिडिओ Vs बघाच हा व्हिडिओ...

First published: April 27, 2019, 8:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading