मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'अण्णा इलो, जलमंदिर पॅलेसवर' उदयनराजेही म्हणाले, 'अण्णा नाईक असो मी', VIDEO

'अण्णा इलो, जलमंदिर पॅलेसवर' उदयनराजेही म्हणाले, 'अण्णा नाईक असो मी', VIDEO

अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आज साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली.

अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आज साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली.

अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आज साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली.

सातारा, 02 ऑक्टोबर : अवघ्या महाराष्ट्राच्या घरात घरात पोहोचलेली 'रात्रीस खेळ चाले' (ratris khel chale 3) मालिकेचा तिसरा भाग सध्या सुरू आहे. या मालिकेतील अण्णा नाईक फेम अभिनेते माधव अभ्यंकर (madhav abhyankar) यांनी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosle) यांच्या जलमंदिर पॅलेसवर जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अण्णांचं तोंड भरून कौतुकही केलं.

अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आज साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना उदयनराजे यांनी मालिकेतील सर्व कलाकारांचं कौतुक केलं.

अण्णा नाईक यांचा अभिनय मला काय सर्वांनाच आवडतो. त्यांचीही नैसर्गिक कला आहे. काही कलाकारांच्या अंगी हा जन्मजात गूण असतो. त्याच्यामध्ये त्यांचा डायलॉग ',' हा सर्वांना पाठ झाला आहे, असं म्हणत उदयनराजेंनी डॉयलॉगच म्हणून दाखवला.

'मला बऱ्याच दिवसांपासून महाराजांची भेट घेण्याची इच्छा होती, अखेर आज ती भेट झाली. आमचे मित्र मेघराज राजेंची भेट झाली आणि ते मला थेट उदयनराजेंकडे घेऊन आले आणि आमची भेट झाली, असं म्हणत अभिनेते माधव अभ्यंकर यांनी उदयनराजेंचे आभार मानले.

तसंच, सध्या सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे सुरू आहेत याबाबत खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्या वाढत्या दौऱ्यांवर खोचक टीका केली आहे.

ही मराठमोळी अभिनेत्री करतेय लग्न; सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

'उपमुख्यमंत्री यांना सांगितलं आहे की, जास्तीत जास्त दौरे साताऱ्यात करा म्हणजे माझ्या विचारांना चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करणं तुमचं कर्तव्य आहे. सूचना आम्ही वेळोवेळी देत जाऊ त्या आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारख्या तज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि ते करतील, असं उदयनराजे म्हणाले.

पुणे: दाढी करण्यासाठी सलूनमध्ये शिरला अन् चोरट्यानं 2 लाखांवर फिरवला वस्तारा

तसंच, 'सातारा जिल्ह्याला लाभलेली जी नैसर्गिक देणगी आहे, त्यात पर्यटनाच्या माध्यमातून एमटीडीसी किंवा इतरांबाबत आदित्य ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. नवरात्रीनंतर आम्ही भेटणार आहोत. सर्वाधिक धरणं असलेला हा जिल्हा आहे. व्याघ्र प्रकल्प आहे, महाबळेश्वर, पाचगणी आहे,  त्यामुळे जास्तीत जास्त स्पोर्ट प्रकल्प राबवले जावे. सिनेमाचं शुटिंग इथं वाढावं, त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळेल' अशी माहिती उदयनराजेंनी दिली.

First published: