मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईला निघालेल्या एसटी बसला भीषण accident; 25 प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर

मुंबईला निघालेल्या एसटी बसला भीषण accident; 25 प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर

ST Bus Accident : एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.

ST Bus Accident : एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.

ST Bus Accident : एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.

शिवाजी गोरे, रत्नागिरी, 31 मार्च : शिमगोत्सव साजरा करून पुन्हा परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात (ST Bus Accident) झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) दापोली केळशी येथे उटंबर - मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.

समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे वाहन चालकाचे म्हणणे आहे . परंतु या वाहन चालकाने मद्यपान केलं असल्याचं बोललं जात आहे. सदर वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. तसंच अपघात झाल्याने ही बस केळशी येथे उभी करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जखमी प्रवासी व अन्य प्रवासी यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा - नवी मुंबईत ATM सेंटरला भीषण आग, शेजारीच पेट्रोल पंप असल्याने भीती; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

मुंबईकडे जायला निघालेल्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात झाला असल्याचा आरोप केला जात आहे. केळशी गावानजीक ही बस रस्त्याच्या खाली गेली. प्रवाश्यांनी आरडाओरडा केल्यामुळे केळशी गावातल्या लोकांनी धाव घेतली आणि तात्काळ जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मोठा अनर्थ टळला!

बस अजून थोड्या दूर गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कारण पुढे एका बाजूला भारजा नदी आहे. त्या नदीत बस पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु सुदैवाने ही बस अलीकडेच रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. बसमधील वाहक पसार झाला असून चालकाला मात्र जमावाने ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं आहे. पोलिसांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

दापोली एसटी आगारातून अधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले असून आता या बसचा पंचनामा व लोकांकडून माहिती घेतली जाणार आहे. जे लोक जखमी आहेत अशा जखमी लोकांना प्रथम उपचारासाठी नेण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत अशा लोकांना पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात ताबडतोब आणण्यात येणार आहे. या बसचा अपघात नेमका कसा झाला, हे अधिक तपासातून स्पष्ट होईल.

First published:

Tags: Maharashtra, Major accident, Mumbai, Ratnagiri, St bus accident