मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेच्या आमदाराची गुंडगिरी! मंदिरात वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा VIDEO आला समोर

शिवसेनेच्या आमदाराची गुंडगिरी! मंदिरात वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा VIDEO आला समोर

मारहाणीचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे. यासंदर्भातील कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही.

रत्नागिरी, 09 ऑक्टोबर : राज्यात अनेक प्रश्न समोर असताना शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना नेमकं काय झालं आहे असा प्रश्न पडत आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा रत्नागिरीतील ग्रामदैवतेच्या मंदिरात संयम सुटला आणि त्यांनी वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असू त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी शारदादेवीच्या मंदिरात अर्वाच्च भाषेत जोरदार शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. एका वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानं शिवसेनेसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार शारदा देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ समिती यांच्या बैठकीदरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे.

" isDesktop="true" id="486137" >

गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांचं मूळ गाव चिपळूण तालुक्यातील तुरंबव आहे. या ठिकाणी शारदा देवी मंदिर ट्रस्ट्रचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कमिटी यांची बैठक सुरु होती. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या बैठकीत भास्कर जाधव यांनी अचानकपणे येऊन गोंधल घातला. सुरुवातीला त्यांनी मंदिरातच शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी एका वयोवृद्ध नागरिकाने या प्रकाराचा मोबाईल व्हिडीओ केला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या वृद्ध व्यक्तीलाही मारहाण केली.

हे वाचा-मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजप आमदाराच्या मामाची गोळ्या घालून हत्या

यासंदर्भातील कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही. संबंधित मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ 6 ऑक्टोबर दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. तर या बैठकीला भास्कर जाधव यांना बोलवलं नाही म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Ratnagiri, Uddhav tahckeray