तुम्ही एक्स्प्रेसमध्ये मिळणारी पाण्याची बाटली खरेदी करता? सावधान! आधी पाणी विक्रेत्याचा 'हा' प्रताप बघाच!

तुम्ही एक्स्प्रेसमध्ये मिळणारी पाण्याची बाटली खरेदी करता? सावधान! आधी पाणी विक्रेत्याचा 'हा' प्रताप बघाच!

सीलबंद बॉटलमध्ये बेसिनच्या नळाचं पाणी भरून तो प्रवाशांना विकत असल्याचं एका प्रवाशाने पाहिलं. त्यानंतर या प्रवाशानं रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.

  • Share this:

रत्नागिरी, 06 फेब्रुवारी : कोकण रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी असाल तर पाण्याची सीलबंद बाटली घेताना जरा विचार करा. तुम्ही शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजताय खरे, पण त्या सीलबंद बाटलीतलं पाणी नेमकं कुठून आलंय याची खात्री देता येणार नाही. प्रवाशांना सीलबंद बॉटलमधून बेसिनच्या नळाचं पाणी भरून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीमध्ये उघड झाला आहे. हे लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी रेल्वे पोलिसांनी विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

पाण्यासाठी योग्य दर देऊनही कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळलं जात आहे. याप्रकरणी प्रवाशाने तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तक्रारीनंतर कारवाई करत रवींद्र व्यास या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रवींद्र हा मुळचा गुजरातचा रहिवाशी असून तो जामनगर एक्स्प्रेसमध्ये पिण्याच्या पाण्याची विक्री करत होता. दरम्यान, सीलबंद बॉटलमध्ये बेसिनच्या नळाचं पाणी भरून तो प्रवाशांना विकत असल्याचं एका प्रवाशाने पाहिलं. त्यानंतर या प्रवाशानं रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रवींद्रवर अटकेची कारवाई केली आहे. आपण रेल्वेमध्ये बेसिनच्या नळाचं पाणी सीलबंद बाटलीतून विकत असल्याचं रवींद्रने कबूल केलं आहे. आपण सुरुवातीला नळाचं पाणी भरून विकण्यास सुरूवात केली तेव्हा ही बाब कोणत्याच प्रवाशाच्या लक्षात आली नसल्याने आपण पाण्याची विक्री सुरूच ठेवल्याचं त्यानं यावेळी सांगितलं.

प्रवाशांना चांगल्या सुविधा का नाही?

रेल्वेमध्ये अनेकदा असे प्रकार घडत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. अशा घटना गांभीर्याने घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. जामनगर एक्स्प्रेसमधील या प्रकारानंतर प्रवाशानंतर मिळणाऱ्या सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

-----------------

अन्य बातम्या

'News 18 लोकमत'चा इम्पॅक्ट: गुलाबी रस्त्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

श्रेयाच्या हस्ताक्षराने जयंत पाटीलही भारावले.. म्हणाले, 'व्वा श्रेया! किप इट अप'

First published: February 6, 2020, 8:21 PM IST

ताज्या बातम्या