रत्नागिरी, 12 जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच धरण फुटीची (Ratnagiri panderi dam leakage) भीती असलेल्या पंदेरी गावातील लोकांनी रात्र जागून काढली. जिल्ह्यात पावसाचा इशारा दिल्यामुळे पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारपासून जोरदार पाऊस सुरू असून रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढल्यामुळे धरण फुटेल की काय अशी भीती लोकांच्या मनात अजूनही कायम आहे. धोका टळला असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्यानंतर स्थलांतरित लोक स्वगृही परत आले आहेत. परंतु, लोकांच्या मनामध्ये अजूनही धास्ती कायम आहे.
VIDEO: लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्यांचा हात; भाजप खासदाराचं विधान
जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात रात्री जोरदार पाऊस कोसळला असून आज सकाळपासूनच पुन्हा जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसंच धरणे पाण्याने ओव्हरफ्लो झाले आहेत.
त्यामुळे नदी व धरण प्रभावित क्षेत्रातील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. समुद्र किनारपट्टीवरील धोकादायक वस्ती ना स्थलांतरित या नोटीसा यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान जिल्हा आपत्ती आपत्ती व्यवस्थापन कडून देण्यात आले आहेत. तसंच कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातले आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
कशी आहे आठवड्याची सुरुवात? 'या' राशीच्या लोकांनी आज जरा सांभाळा
दरम्यान, जिल्ह्यात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पावसाचा सर्वाधिक जोर असलेल्या संगमेश्वर मधली गड नदीनल रात्रभर पातळी सोडून वाहत होती.
परिणामी माखजन बाजारपेठमध्ये पुराचे पाणी शिरले होते. मात्र आज सकाळपासून पावसाने पुन्हा काही काळ उसंत घेतल्यामुळे गड नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे, असे असले तरी कळंबुशी, नायशी, वडेर, या गावांना जोडणारा कोंडीवरे येथील पूल अद्यापही पाण्याखाली असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
पावसाचा जोर आज कायम राहिल्यास जिल्ह्यातील अनेक भागात नद्या पातळी सोडून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर दमदार पुरागमन केलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.