• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • जाळीत अडकले होते माकडाचे इवलेसे पिल्लू, प्राणी मित्राने घडवली माय लेकराची भेट! 

जाळीत अडकले होते माकडाचे इवलेसे पिल्लू, प्राणी मित्राने घडवली माय लेकराची भेट! 

परसबाग किंवा घराच्या छतावर प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी अनेक वेळा मच्छीमारी जाळी लावली जाते.

  • Share this:
शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 21 मार्च : अन्न पाण्याच्या शोधात आई सोबत आलेलं माकडाचे (Monkey) पिल्लू घराच्या छतावर लावलेल्या जाळीत अडकले होते. परंतु प्राणी मित्रांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे सुखरूप सुटका करण्यात आली. जाळ्यातून सुटका होताच त्याची आई पिल्लाजवळ आली आणि आपल्या पिल्लाला उचलून घेऊन पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात निघून गेली. रत्नागिरी  (Ratangiri) जिल्ह्यातील आडे गावातील निकेतन नांदगावकर यांच्या घराच्या गच्चीवर लावण्यात जाळीमध्ये एक माकडाचे लहान पिल्लू अडकले होते. याची माहिती मिळाल्यावर  प्राणी वन्यजीव रक्षक मनीत बाईत या तरुणाने जाळीत अडकलेल्या माकडाच्या पिल्ला जीवदान दिले आहे. यापूर्वी या तरुणाने जाळीत अडकलेल्या अजगराला सुखरूप सोडविले होते तसेच आणि परिसरात जाळीमध्ये अडकलेल्या अनेक मुक्या प्राण्याची त्याच्याकडून सुटका झाली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील 'या' 3 भागांत पावसाचा अंदाज, काही तासांतच मेघगर्जनेसह कोसळणार एखादी प्राणी संकटात असल्याच्या त्याला फोन जाताच तात्काळ घटनास्थळी तो धावून जातो व प्राण्याची सुखरूप सुटका करतो. हा त्याचा हातखंडा बनला असून प्राण्याचा जीव वाचवणे हे आपला छंद असून यापूर्वी आपण असे अनेक प्राण्यांची सुखरूप सुटका करून जीवदान दिले आहे, असेही बाईत म्हणाला. परसबाग किंवा घराच्या छतावर प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी अनेक वेळा मच्छीमारी जाळी लावली जाते. परंतु, सुरक्षा म्हणून लावण्यात आलेल्या जुनाट मच्छी जाळीमध्ये अनेक वेळा कबूतर तर काही वेळा माकडे, कुत्र्याचे पिल्लू व जंगली श्वापदे यामध्ये अडकून मृत्यू होत आहे. काही वेळा तर चक्क या जाळीमध्ये व डुक्करासाठी लावण्यात आलेल्या फासकीमध्ये बिबटे अडकून मृत्यू झाल्याच्या दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. mansukh hiren death प्रकरणाचा धक्कादायक वळण, 'तो' कट मनसुख यांना समजला होता! त्यामुळे संरक्षण म्हणून लावण्यात आलेल्या जाळीत एखादी जंगली प्राणी किंवा पक्षांचा मृत्यू होत असल्याने संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्या प्राण्यांच्या जीवावर बेतल्या आहेत. त्यामुळे जाळी लावताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसंच जाळीमध्ये एखादी जंगली प्राणी किंवा पक्षी अडकल्यास प्राणी मित्राला बोलावून त्याची ताबडतोब सुटका करण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. जुनाट मासेमारी जाळीत अडकून अनेक मुक्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे, जाळी लावताना लोकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असं आवाहन बाईत याने केलं आहे.
Published by:sachin Salve
First published: