Home /News /maharashtra /

VIDEO: रत्नागिरीतील जंगलात मोठा वणवा; 450 एकर जागेवरील झाडे जळून खाक

VIDEO: रत्नागिरीतील जंगलात मोठा वणवा; 450 एकर जागेवरील झाडे जळून खाक

Major fire in Ratnagiri Forest: रत्नागिरीतील जंगलात भीषण वणवा लागल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी, 2 जून: रत्नागिरी जिल्ह्यातल्या (Ratnagiri District) खेडमधील सात्विनगाव येथील फॉरेस्टच्या आरक्षित जंगलाला मोठा वणवा (major fire in khed forest) लागला आहे. हा वणवा इतका भीषण आहे की त्यामुळे जवळपास 450 एकर विस्तृत जंगलातील झाडे जाळून खाक (trees burn around 450 acres) झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा वाणवा लागल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अनेक गावकऱ्यांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवण्यात आले. मात्र बराचवेळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर नॉट रिचेबल लागत असल्याने गावकऱ्यांनीच ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. आयुर्वेदाच्या मदतीने बरे झाले 600 कोरोना रुग्ण; बाबा रामदेव - IMA चा वाद सुरू असतानाच मोठी अपडेट या जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक लहान प्राणी आणि सरपटणारे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या वर्षातली अशा प्रकारे वणवा लागण्याची ही तिसरी घटना असून वन विभागाच्या वतीने सतत लागणाऱ्या वणव्यांना रोखण्यासाठी काहीही उपाययोजना आत्तापर्यंत केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा वानवा लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी तात्काळ लोटे एमआयडीसी च्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. तोपर्यंत या ग्रामस्थांनी सुमारे तीन ते चार तास ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न अनेक ग्रामस्थ करत होते मात्र त्यांचे संपर्क क्रमांक नॉट रिचेबल लागत होते. अखेरीस संपर्क झाल्यानंतर चार वन विभागाचे अधिकारी आग विझल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Fire, Ratnagiri

पुढील बातम्या