Home /News /maharashtra /

Lote MIDC Fire VIDEO: लोटे एमआयडीसी स्फोटांनी हादरली; कंपनीला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Lote MIDC Fire VIDEO: लोटे एमआयडीसी स्फोटांनी हादरली; कंपनीला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोटे एमआयडीसी स्फोटांनी हादरली; कंपनीला भीषण आग

लोटे एमआयडीसी स्फोटांनी हादरली; कंपनीला भीषण आग

Ratnagiri Lote MIDC Fire: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी कंपनीत पुन्हा एकदा अग्नितांडव, कंपनीला आग लागल्यानंतर अनेक मोठ-मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी, 17 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात असलेली लोटे एमआयडीसी (Lote MIDC) मोठ मोठ्या स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 39 येथील प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीला भीषण आग (Fire in Privee Organics limited company) लागली. कंपनीत सहा ते सात स्फोट झाले आणि भीषण आग लागली. (Fire caught in Lote MIDC company) ही इतकी मोठी होती की, तब्बल दहा किलोमीटर लांबून आगीच्या धुराचे लोट दिसून येत होते. या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीये अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कंपनीतील सॉल्व्हंट केमिकलच्या ड्रम ठेवलेल्या विभागांमध्ये आग लागली आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. ज्या कंपनीत स्फोट होऊन आग लागली त्याच्या शेजारीच सीएनजी गॅस कंपनी असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. वाचा : भाजप आमदार गणेश नाईकांसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशन, महिलेनं केला गुन्हा दाखल आगीची माहिती मिळताच खेड, चिपळूण तालुक्यातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या शर्थीने अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आता नियंत्रणात आणली. तब्बल चार तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. लोटे एमआयडीसीमध्ये अपघातांचे आणि स्फोटांचे प्रमाण वाढत असून गेल्या वर्षभरात सहाहून अधिक मोठे स्फोट झाले असून त्यात 20 हून अधिक लोकांचा जीव यापूर्वी गेला आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत तिघांचा होरपळून मृत्यू तर 7 गंभीर जखमी 18 एप्रिल 2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर सात जण गंभीररित्या जखमी झाले होते. रविवारी (18 एप्रिल 2021) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लोटे एमआयडीसीतील श्री समर्थ इंजिनिअरिंग या कंपनीतील इसलॅशम प्लान्टमध्ये अति ज्वलनाग्राही सॉल्व्हन्ट केमिकल असलेल्या रिअ‍ॅक्टरचे अचानक टेम्प्रेचर वाढले आणि स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की एमआयडीसी परिसर पूर्णपणे हादरून गेला. या स्फोटानंतर कंपनीत आग लागली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Fire, Ratnagiri

पुढील बातम्या