रत्नागिरीमध्ये विहिरीत गुदमरून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरीमध्ये विहिरीत गुदमरून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू

विहिरीत गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 3 जून  : विहिरीत गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील ही दुर्दैवी घटना आहे. विहिरीची साफसफाई करण्यासाठी हे तिघं जण त्यात उतरले होते. यावेळेस या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. निवसर गावातली ही घटना आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. रविवारी (2 जून ) संध्याकाळी ही घटना घडली.

विजय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत.  निवसर वरचीवाडी येथील एका बागेतील 18 फूट खोल विहिरीच्या साफसफाईचं काम या कामगारांच्या हाती देण्यात आलं होतं. दुपारचं जेवण आटोपून हे तिघंही जण संध्याकाळी पुन्हा कामाला लागले. पण काही वेळानंतर या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाहा अन्य महत्त्वाच्या बातम्या

SPECIAL REPORT : टँकरमधून सांडणारं पाणी मिळवण्यासाठी महिलांची जीवघेणी धाव!

SPECIAL REPORT : विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तो खोल विहिरीत उतरला, पुढे काय घडलं?

SPECIAL REPORT : शरद पवारांनी का व्यक्त केली भाजपच्या 'त्या' पराभवावर शंका?

SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!

First published: June 3, 2019, 7:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading