Home /News /maharashtra /

विचित्र अपघात! रुग्णवाहिका...Hyundai आणि इर्टिगाची जोरदार धडक, लहान मुलांसह महिला जखमी

विचित्र अपघात! रुग्णवाहिका...Hyundai आणि इर्टिगाची जोरदार धडक, लहान मुलांसह महिला जखमी

अपघातात कारमधील दोन लहान मुले आणि एक महिला जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

खेड, 12 सप्टेंबर : कळबणी उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह घेऊन चिपळूणला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला समोरून येणाऱ्या ह्युंदाई कारने धडक दिली. तर रुग्णवाहिकेमागून येणाऱ्या इर्टिगाची मागून धडक बसून मुंबई गोवा महामार्गावर सरस्वती पेट्रोल पंपाजवळ तिहेरी अपघात झाला. रुग्णवाहिका, मारुती इर्टिगा आणि ह्युंदाई या तीन गाड्यांचा हा अपघात झाला. अपघातात कारमधील दोन लहान मुले आणि एक महिला जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. खेडहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ह्युंदाई कारने कळबणी उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह घेऊन चिपळूणला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला समोरासमोर धडक दिली. तर रुग्णवाहिकेच्या पाठीमागून येणाऱ्या इर्टिगा कार दोन्ही गाड्यांवर पाठीमागून आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारमधील दोन लहान मुले आणि एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सुरू आहे. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भरणे, खेड येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. खेड पोलिसांनी देखील अपघाताच्या ठिकाणी धाव घेत मदतकार्य केलं.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ratnagiri

पुढील बातम्या