रत्नागिरीच्या समुद्रात थरारक घटना, लाटेपासून वाचण्यासाठी बोट फिरवली, पण...

रत्नागिरीच्या समुद्रात थरारक घटना, लाटेपासून वाचण्यासाठी बोट फिरवली, पण...

भारजा नदीच्या खाडीतून समुद्रात जात असताना मोठी लाट आली. बचावासाठी एकदम वळण घेत असताना बोटीवर लाट आपटून बोट पलटी झाली.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 16 ऑगस्ट : रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी समुद्र किनारी मासेमारी बोटीला जलसमाधी मिळाली. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर बोटीतील जाळीतच एक मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

15 ऑगस्ट रोजी माशाअल्ला ही बोट क्रमांक IND MH04MM3171 ( 08जणासह) आणि इतर 8 बोटी सायंकाळी  (15 ऑगस्ट) रोजी  अंदाजे साडेचारच्या दरम्यान भारजा नदीच्या खाडीतून समुद्रात जात असताना मोठी लाट आली. बचावासाठी एकदम वळण घेत असताना बोटीवर लाट आपटून बोट पलटी झाली. यामधील मकबूल शेखअली चाऊस बोट मालक, सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे सहाजण बोटीबाहेर फेकले गेले. त्यांच्या सोबत असणाऱ्या बोटीवरील लोकांनी ताबडतोब मदत करून वाचवण्यात यश मिळवले.

कोल्हापूर, सांगलीकरांनो, सतर्क राहा! पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा महापुराचे संकट

पण इतर दोन शादत इब्राहिम बोरकर आणि गणी इस्माईल खमसे हे बोटीखाली सापडल्याची दाट शक्यता होती. त्यातील शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह रविवारी सकाळी बोटीच्याच जाळ्यात सापडला. 6 पैकी दोन जनांची प्रकृती बिघडल्याने दापोली उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

20 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यपाल किल्ले शिवनेरीवर, पायी चालत करणार गडाची पाहणी

दरम्यान, शनिवारी रात्री उशीर झाल्याने शोधकार्य स्थानिक लोकांच्या मदतीने चाललेले थांबवलेले होते.समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीने काही दिवसांपूर्वी गुहागर समुद्र किनारी बोट बुडाली होती. आता केळशी समुद्र किनारी बुडाली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांवर संकट सुरूच आहे.

Published by: sachin Salve
First published: August 16, 2020, 9:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या