रत्नागिरी, 31 जुलै : संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असताही कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात अपयश येत आहे. या स्थितीत आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करताना पाहायला मिळतात. मात्र असंच काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक प्रकार घडला.
रत्नागिरी जिल्ह्यातील अड़खल जुईकर मोहल्ला येथे कोरोना सर्व्हेचे काम थांबवा म्हणत गावातील लोकांनी आरोग्य सेविका कर्मचाऱ्याला घेराव घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
गावातील 50 ते 60 लोकांनी घेराव घालत महिला कर्मचाऱ्याला दमदाटी करत गावातून हाकलून लावलं. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले चिंतेचे विषय होत आहेत .
हेही वाचा - कोरोनाची धास्ती! शासकीय रुग्णालयातून पलायन करून कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरी नाटे येथे आरोग्य विभाग व पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्याची घटना ताजी असतानाच दापोली तालुक्यातील अड़खल गावात चक्क आयोग्यसेविकेला गावातील सर्वे करण्यास अटकाव करण्यात आला. या महिला कर्मचाऱ्याच्या गाडीची चावी देखील हिसकून घेतली गेली. तसेच पुरुष मंडळीने दमदाटी केली.
दरम्यान, याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल. कारण आरोग्य कर्मचाऱ्यांबाबतीत असे प्रकार वारंवार घडल्यास कामादरम्यान त्यांचं खच्चीकरण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.