बिबट्याचा बछडा घुसला घरात; ऐन पावसात फुटला घाम

बिबट्याचा बछडा घुसला घरात; ऐन पावसात फुटला घाम

मादी बछड्यापासून ताटातूट झालेल्या बछड्यानं घराचा आसरा घेतल्यानं घरातील लोकांची पाचावर धारण बसली

  • Share this:

रत्नागिरी, 28 जून : कोकणात देखील सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची ताटातूट झाली. आईच्या शोधात असलेल्या या बछड्यानं त्यानंतर थेट घराचा आसरा घेतला. त्यामुळे घरातील लोकांची मात्र पाचावर धारण बसली. हा सारा प्रकार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मेर्वी खर्डेवाडीतील. मादी बिबट्यापासून ताटातूट झालेला बछडा आसऱ्यासाठी घरात शिरला. समोर बछड्याला पाहून घरातील लोक घाबरले. काही वेळात ही बातमी वाऱ्याच्या वेगानं गावात पसरली. लोकांनी देखील बछड्याला पाहायाला गर्दी केली.

प्राणिमित्र प्रदीप डिंगणकर आणि सिद्धेश पावसकर यांनी घटनास्थळी जाऊन बछड्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी तात्काळ ही बाब वनविभागाला कळवली. पण, वनविभागानं त्या बछड्याला जंगलात सोडल्यानंतर देखील बछडा पुन्हा एकदा वस्तीत आला आहे. विजेच्या प्रकाशामुळे वस्तीत पुन्हा आलेल्या या बछड्याला सुरक्षित स्थळी ठेवण्यात येणार असून मादीची वाट पाहणार असल्याचं वनविभागानं सांगितलं.

कोकणात मुसळधार

कोकणात देखील सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. कोकणातील अनेक गावं ही दुर्गम भागात असल्यामुळे या ठिकाणी जंगली जनावरांचा देखील वावर असतो. मेर्वी खर्डेवाडी येथे देखील बिबट्या वस्ती शेजारून जात असताना मादी बिबट्या आणि बछड्याची ताटातूट झाली. त्यामुळे या बछड्यानं अखेर एका घराचा आसरा घेतला. पण, जंगलात सोडल्यानंतर देखील बछडा पुन्हा एकदा वस्तीमध्ये परतलं आहे.

पावसामुळे कोकणातील नदी - नाल्यांना देखील पूर आला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे.

मध्य रेल्वेचं रडगाणं सुरू, अनेक स्थानकांत पाणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 28, 2019, 4:30 PM IST
Tags: ratnagiri

ताज्या बातम्या