शत्रूला कधी कमी लेखू नये! बेडकाने गिळला अख्खा साप, VIDEO व्हायरल

शत्रूला कधी कमी लेखू नये! बेडकाने गिळला अख्खा साप, VIDEO व्हायरल

साप नेहमीच बेडकाची शिकार करतो. परंतु, एका बेडकाने सापाला कायमची अद्दल घडवली आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 09 ऑक्टोबर : साप  नेहमीच बेडकाची शिकार करतो. त्यामुळे आपण नेहमी साप बेडकाला गिळल्याचे  पाहतो. परंतु, एका बेडकाने सापाला चांगलीच कायमची अद्दल घडवली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोलथरे गावातील माधव महाजन यांचे बागेत बेडूक आणि सापाचं युद्ध कॅमेऱ्यात कैद झालं आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं हे जीवघेणी लढाई सुरू होती. अखेरीस बेडकाने विजय मिळवत सापाला फस्त केलं.

खरंतर  साप हा उंदीर आणि बेडूक यांचा शत्रू आहे. त्यामुळे बेडूक, साप आणि उंदीर हे तिघे एकत्र दिसत नाहीत. पण साप दिसला की, उंदीर आणि बेडूक पळून जातात. परंतु, महाजन यांच्या बागेत वेगळचं चित्र पाहण्यास मिळालं. सापाने जेव्हा हल्ला केला तेव्हा बेडकाने त्याच ताकदीने प्रतिकार केला. सापाला कडवी झुंज देत अखेर बेडकानेच सापाला गिळले.

===========================

Published by: sachin Salve
First published: October 9, 2019, 7:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading