Home /News /maharashtra /

एका माशामुळे नशीब चमकलं अन् रत्नागिरीतील मच्छीमार रातोरात बनला लखपती

एका माशामुळे नशीब चमकलं अन् रत्नागिरीतील मच्छीमार रातोरात बनला लखपती

रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदर मासेमारी लिलावासाठी प्रसिद्ध आहे.

    शिवाजी गोरे प्रतिनिधी रत्नागिरी, 7 सप्टेंबर :  रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) हरणे बंदर मासेमारी (Fishing) लिलावासाठी प्रसिद्ध आहे. परंतु हे बंदर पुन्हा एकदा चर्चेत आल आहे ते एका माशाचा लिलावामुळे (Fish auction). तब्बल दोन लाख रुपयांना माशाचा लिलाव झाला आहे आणि त्यामुळे बोट मालकाचे नशीब चांगलेच फळफळले आहे. एकाच माशामुळे बोट मालक एकाच दिवसात लखपती बनला आहे. घोळ माशाचा लिलाव दोन लाख रुपयांना झाल्याने बोट मालक राउफ हजवाने लखपती बनले आहेत. लिलावात एम एम फिशरीज कंपनीने हा मासा दोन लाख रुपये मोजून खरेदी केला आहे. या माशाचा लिलाव चक्क दोन लाख रुपये झाल्याने बोट मालकाबरोबरच अनेक मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रत्नागिरीत समुद्राला उधाण; अजस्त्र लाटांनी बोटीचे झाले तुकडे-तुकडे, घटनेचा LIVE VIDEO दुर्मिळ असणारा हा मासा क्वचितच आढळून येतो. सहसा मच्छीमारांच्या जाळ्यात मरत नाही परंतु ज्यांच्या जाळ्यात हा मासा पडेल त्याला तो लखपती बनवल्या शिवाय राहत नाही याचे मूर्तीमंत उदाहरण हरणे बंदर आज पाहायला मिळाले. तुम्हाला या माशाची किंमत ऐकून आश्चर्य वाटले असेल ना? परंतु हे खरे आहे हा मासा साधासुधा नसून औषधी गुणधर्म असलेला हा मासा आहे. त्याच्या शरीरामधला पाईप ऑपरेशनचा दोरा बनवण्यासाठी वारपरला जातो आणि त्याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे, त्यामुळे या माशाला मार्केटमध्ये खूप किंमत असते. पालघरमधला मच्छीमारही रातोरात करोडपती यापूर्वी असाच प्रकार पालघर जिल्ह्यातून समोर आला होता. येथील मच्छीमार चंद्रकांत तरे यांना मासेमारी करताना दीडशेहून अधिक घोळ जातीचे दुर्मिळ मासे सापडले. या माशांची बाजारात विक्री झाल्याने ते एका रात्रीत करोडपती बनले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Fish, Ratnagiri

    पुढील बातम्या