मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खतरनाक! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं धुमशान, जाणून घ्या अपडेट्स

खतरनाक! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं धुमशान, जाणून घ्या अपडेट्स

Ratnagiri Rain Updates:  रत्नागिरी (Ratnagiri District) जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert)कायम आहे.  जाणून घ्या पावसासंदर्भातले लेटेस्ट अपडेट्स.

Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी (Ratnagiri District) जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert)कायम आहे. जाणून घ्या पावसासंदर्भातले लेटेस्ट अपडेट्स.

Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी (Ratnagiri District) जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert)कायम आहे. जाणून घ्या पावसासंदर्भातले लेटेस्ट अपडेट्स.

  • Published by:  Pooja Vichare

रत्नागिरी, 20 जून: रत्नागिरी (Ratnagiri District) जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert)कायम आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा धोका अजूनही कायम आहे. (Heavy Rainfall)

शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसाने संगमेश्वर तालुक्यातील गड नदी, लांजा तालुक्यातील काजळी नदी, खेड तालुक्यातील जगबुडी नदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र काल दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर ओसरल्याने जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी आटोक्यात आहे.

तसेच जयगड, दाभोळ ,आंजर्ले, बाणकोट या सर्व खाड्या सुद्धा पूर्व पदावर आल्या आहेत. समुद्र मात्र मोठ्या प्रमाणात खवळले असून समुद्राला उधाण आलं आहे. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. सध्या जिल्ह्याचा पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र अतिवृष्टीचा इशारा कायम कायम आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे. धोक्याच्या पातळीच्या वरून वाहणाऱ्या जगबुडी नदीचे पाणी आज काही प्रमाणात ओसरले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला पुराचा धोका नाही आहे. काल शनिवारी 7.20 मीटर पाण्याची पातळी असलेल्या जगबुडी नदीची आजची पाण्याची पातळी 6 मीटर इतकी आहे. जगबुडीची पाण्याची पातळी तब्बल दीड मीटरने कमी झाल्याने पूरग्रस्त भागांचा धोका टळला आहे.

चिपळूण आणि संगमेश्वर भागात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेली 5 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील गड नदीवरील धरण पूर्णपणे भरल्यामुळे नदीकाठी असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे गड नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे. आज सकाळ पासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. रत्नागिरी,राजापूर,संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर मध्ये सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

तर दुसरीकडे 4 दिवसांपासून सतत रायगड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे.रायगड जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरूच आहे. कोलाड रोहा मधील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीच्या वर आली आहे. जिल्ह्यातील सगळ्या नद्या, नाले भरून वाहत आहेत. आज रविवार असल्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं जिल्हा प्रसाशन आवाहन केले आहे.

First published:

Tags: Rain, Ratnagiri