मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचं वर्चस्व, राणे समर्थकांचा केला सुपडा साफ

रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचं वर्चस्व, राणे समर्थकांचा केला सुपडा साफ

Ratnagiri district bank election: कोकणात उदय सामंतांचे पुन्हा वर्चस्व पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला आहे.

Ratnagiri district bank election: कोकणात उदय सामंतांचे पुन्हा वर्चस्व पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला आहे.

Ratnagiri district bank election: कोकणात उदय सामंतांचे पुन्हा वर्चस्व पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला आहे.

  रत्नागिरी, 21 नोव्हेंबर : रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल (Ratnagiri district central co-operative election result) समोर येत आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली आहे. शिवसेना नेते नामदार उदय सामंत (Uday Samant) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने वर्चस्व निर्माण केलं (Sahakar panel wins maximum seats) आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या पँनलचा सुपडा साफ झालां आहे.

  एकूण 21 जागांपैकी 18 जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे समर्थक दणदणीत निवडून आले आलेत. तर निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे कोकणातील आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना दारूण पराभवाचं तोंड पहावं लागलंय.

  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचं लक्षं लागलं होतं. त्यांचे निकाल आज घोषीत करण्यात आलेत. 21 पैकी 18 जागांवर विजय मिळवत सहकार बॅनलने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे हे स्पष्ट झालं आहे.

  वाचा : 'पुन्हा फर्जीवाडा' म्हणत क्रांती रेडकर यांनी शेअर केले हॉटेलचे फोटो अन् साधला नवाब मलिकांवर निशाणा

  सहकार पॅनलचे गजानन पाटील यांनी रत्नागिरीत विजय मिळवला आहे. तर गुहागरमधील सहकार पॅनलचे डॉ. अनिल जोशी यांनी विजय मिळवला आहे.

  निवडणुकीत 87 टक्के मतदान

  रत्नागिरी जिल्हा बँकेसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण 871 मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला होता. या निवडणुकीत 87.45 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे.

  रत्नागिरी जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागा आहेत. या 21 जागांपैकी 14 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर इतर जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या 7 जागांसाटी एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

  सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन गटांत राडा

  सातारा जिल्हा बँकेची आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 21 पैकी 10 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटांत राडा झाल्याचं पहायला मिळालं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.

  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणाऱ्या मतदानामध्ये तणाव पाहायला मिळत आहे. जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून जावली तालुक्यातील मेढा मतदान केंद्रावर तणाव कायम आहे.

  First published:

  Tags: Election, Narayan rane, NCP, Ratnagiri, Shiv sena