मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना रुग्णांसोबत घडला भयंकर प्रकार, अल्पोपहारामध्ये आढळलं चक्क मेलेलं झुरळ

कोरोना रुग्णांसोबत घडला भयंकर प्रकार, अल्पोपहारामध्ये आढळलं चक्क मेलेलं झुरळ

पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

घरडा कोव्हिड केअर सेंटरमध्ये 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी, 6 ऑगस्ट : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील घरडा सीसीसी म्हणजेच कोव्हिड केअर सेंटरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी आयसोलेशन वॉर्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना अल्पोपहार देण्यात आला. मात्र त्यामध्ये चक्क मेलेले झुरळ आढळल्याने रुग्णांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

घरडा कोव्हिड केअर सेंटरमध्ये 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे अल्पोपहार म्हणून उपमा देण्यात आला. त्यातील एका रुग्णाला त्या उपम्यात मेलेले झुरळ आढळल्याने रुग्णांनी तेथील डॉक्टर यांच्याकडे तक्रार केली. हा प्रकार सोशल मीडियावरून समोर आल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळचा आलेला अल्पोपहार पुन्हा पाठवून नवीन अल्पोपहार मागावण्यात आला.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून घरडा कोव्हिड केअर सेंटर येथे नित्कृष्ठ दर्जाचे जेवण मिळते आशा अनेक तक्रारी याआधीही आल्या आहेत. मात्र प्रशासनाने याकडे डोळेझाक केली. नुकत्याच दौऱ्यावर येऊन गेलेल्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी देखील सबंधित ठेकेदाराला समज द्या नाहीतर हा ठेका अन्य कोणाला तरी द्या आशा सूचना 15 दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिल्या होत्या.

मात्र आज अल्पोपहारात मेलेले झुरळ आढळल्याने प्रशासनाची चांगलीच धबपळ उडाली आहे. आता सदर ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Ratnagiri