क्या बात है! PPE किट घालूनच सुरू केलं सलूनचं दुकान, 'या' जिल्ह्यातील VIDEO VIRAL

क्या बात है! PPE किट घालूनच सुरू केलं सलूनचं दुकान, 'या' जिल्ह्यातील VIDEO VIRAL

सध्या सलूनमध्ये पीपीई किट घालून काम करणाऱ्या कारागिरांची चर्चा रत्नागिरी शहरात आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 30 मे : चौथं लॉकडाऊन संपताना रत्नागिरीत बंद असलेली सलून दुकानं आता सुरू झाली आहेत. पण योग्य ती खबरदारी घेऊनच सलून व्यावसायिक काम करताना पाहायला मिळत आहेत.  रत्नागिरीतील कृष्णाई सलूनमध्ये तर कारागीर पीपीई किट घालूनच काम करतात. तसंच इथे आलेल्या गिऱ्हाईकाची नोंदणी केली जाते. प्रत्येक गिऱ्हाईकाला आपलं नाव आणि मोबाईल नंबर देणे देखील अनिवार्य आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रोगाची लक्षणे असलेल्या गिऱ्हाईकाला सलूनमध्ये प्रवेश दिला जात नाही. शिवाय, गिऱ्हाईक गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज केली जाते.  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ही सर्व काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सध्या सलूनमध्ये पीपीई किट घालून काम करणाऱ्या कारागिरांची चर्चा रत्नागिरी शहरात आहे.

रत्नागिरीत काय आहे कोरोनाची स्थिती?

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हातील कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 234 वर पोहोचली आहे.

कामथे रुग्णालय - 12, राजापूर - 4, रत्नागिरी - 6, कळंबणी -3 संगमेश्वर- 1 असे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कोरोनाचा धोका वाढत असून आतापर्यंत 25 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 18 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.  तालुक्यात 13 गावांमध्ये कंटेन्टमेंट झोन करण्यात आला असून लोटे येथील एका डॉक्टरला देखील कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 85 जणांना होम क्वारन्टाइन करण्यात आहे.

सलून आणि पार्लर असोसिएशनची नवी मागणी

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर युपी व कर्नाटक सरकारने दिलेल्या अर्थिक पॅकेज प्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सलून व्यावसायिक व बारा बलुतेदार छोटे मोठे व्यावसायिक यांना अर्थिक पॅकेज जाहीर करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात सलून व छोटे मोठे व्यावसाय बचाव आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे लवकरच अर्थिक पॅकेजची घोषणा करणार आहेत. यामध्ये सलून व्यावसायिक व छोटे मोठे बारा बलुतेदार व्यावसायिक यांचा देखील विचार व्हावा अशी मागणी सलून आणि पार्लर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. कित्येक दिवस सतत संपूर्ण महाराष्ट्रातून सलून व पार्लर असोसिएशन व बारा बलुतेदार छोटे मोठे व्यावसायिक पाठपुरावा करत आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 30, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading