ध्वजारोहनासाठी आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्याला 14 दिवसांसाठी क्वारन्टाइन करा, भाजप जिल्हाध्यक्षांनी केली मागणी

ध्वजारोहनासाठी आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्याला 14 दिवसांसाठी क्वारन्टाइन करा, भाजप जिल्हाध्यक्षांनी केली मागणी

या मागणीमुळे रत्नागिरीतील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 15 ऑगस्ट : 'ध्वजारोहनासाठी आलेल्या पालकमंत्री अनिल परब यांना जिल्हा प्रशासनाने 14 दिवसांसाठी क्वारन्टाइन करावं,' अशी मागणी भाजपचे जिल्हाअध्यक्ष डॉ.विनय नातू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विनय नातू यांच्या या मागणीमुळे रत्नागिरीतील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'बिहारचे पोलीस अधिकारी श्री. तिवारी यांना ज्याप्रमाणे मुंबई महानगर पालिकेने क्वारन्टाइन केले होते, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासनाने ध्वजारोहन करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री अनिल परब यांना देखील क्वारन्टाइन करावं. जेणेकरून जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील,' अशी अजब मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ विनय नातू यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

'जिल्ह्याचे पालकमंत्री हे क्वारन्टाइन होण्यासाठी मुंबईत जातात आणि कधीतरी रत्नागिरीत येतात. त्यामुळे आज ध्वजारोहन करण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या पालकमंत्री यांना 14 दिवसांसाठी क्वारन्टाइन करण्यात यावे, जेणेकरून जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात त्याचप्रमाणे ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयात कोविडच्या रुग्णांसाठी असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी त्यांची मदत होईल,' अशी टीकाही विनय नातू यांनी केली आहे.

दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्षांच्या या टीकेला अद्याप शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेलं नाही. मात्र या मागणीनंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 15, 2020, 1:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading