Home /News /maharashtra /

VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावर घाटात तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली कार

VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावर घाटात तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली कार

मुंबईच्या दिशेने जाणारी मारुती व्हॅन चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळली.

खेड, 18 डिसेंबर : मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात एका अवघड वळणावर कार थेटट 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त व्हॅनमधून प्रवास करणारे चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून हा अपघात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. खेडहून मुंबईच्या दिशेने जाणारी मारुती व्हॅन चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप येथील महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दरीत उतरून पोलिसांनी गाडीत अडकलेल्या प्रवाशांना खांद्यावर उचलून सुरक्षित ठिकाणी आणले. प्रवाशांना सुरक्षित स्थळी आणल्यानंतर सर्व जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. हे सर्व प्रवासी कापूरहोळ, पुणे येथून रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी आले होते. पुन्हा घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. दरम्यान, महाराष्ट्रासाठी शुक्रवारी हा खऱ्या अर्धाने घातवार ठरला. कारण राज्यात शुक्रवारी दिवसभरात अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून यामध्ये 10 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. तसंच अनेकजण या अपघातांमध्ये जखमीही झाले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ratnagiri, Road accident

पुढील बातम्या