मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shocking ! रत्नागिरीत 15 वर्षीय मुलाला 15 मिनिटांत कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस, घटनेने जिल्ह्यात खळबळ

Shocking ! रत्नागिरीत 15 वर्षीय मुलाला 15 मिनिटांत कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस, घटनेने जिल्ह्यात खळबळ

Shocking ! 15 वर्षीय मुलाला 15 मिनिटांत दोन डोस; आरोग्य कर्मचारी म्हणाले चुकून झालं

Shocking ! 15 वर्षीय मुलाला 15 मिनिटांत दोन डोस; आरोग्य कर्मचारी म्हणाले चुकून झालं

15 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात आता या मुलांचे लकृसीकरण सुरू झाले असतानाच रत्नागिरीतील चिपळूण येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

रत्नागिरी, 6 जानेवारी : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने (Central Government) आता 15 ते 18 वर्षाच्या वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता मुलांचे लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, त्याच दरम्यान रत्नागिरीतील चिपळूण (Chiplun Ratnagiri) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिपळूण येथे एका 15 वर्षीय मुलाला 15 मिनिटांच्या अंतराने कोविड प्रतिबंधात्मक लसीचे चक्क दोन डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Shocking! 15 year old child vaccinated twice within 15 minutes in Chiplun Ratnagiri)

काय आहे संपूर्ण प्रकार?

रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात असलेल्या फुरूस येथील आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. येथील एका 15 वर्षीय मुलाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी 15 मिनिटांच्या अंतराने चक्क कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वाचा : मुंबईत कोरोनाचा Outbreak,तीन दिवसात 230 निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

आरोग्य कर्मचारी म्हणतात...

या घटनेनंतर संबंधित मुलाच्या वडिलांनी रुग्णालय गाठलं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले. मुलाच्या वडिलांनी सांगितलं, 15 वर्षांवरील मुलांचे आज लसीकरण होते. माझा मुलगा हा सुद्धा लस घेण्यासाठी रुग्णालयात आला. यावेळी त्याला दोन डोस देण्यात आले. मी रुग्णालयात येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारले की, असं तुम्ही का केलं? तर ते म्हणतात की, चुकून झालं.

मुलाची प्रकृती कशी?

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस दिलेल्या मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याला कामथे उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली हा मुलगा सध्या आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुलाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवालही मुलाच्या पालकांनी विचारला आहे.

वाचा : पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट? 100 वरुन रुग्णसंख्या थेट 1800 च्या घरात

खेडमध्ये चार शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली पाठोपाठ खेडमध्ये एका शाळेतील चार शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून एका खेड मध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी 82 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 231 एवढी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, नव्या बाधितांचा आकडा 26 हजार पार

महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 26 हजार 538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 331 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.55 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Ratnagiri