पेंग्विन, नाईट लाईफपेक्षा लोकांच्या जिवाची काळजी करा - नितेश राणे

पेंग्विन, नाईट लाईफपेक्षा लोकांच्या जिवाची काळजी करा - नितेश राणे

पेंग्विन कुरवाळत बसण्यापेक्षा नागरिकांच्या जिवाची काळजी करा, सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून नितेश राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन (CSMT) परिसरात झालेल्या पूल दुर्घटनेवरून मुंबई महापालिकेवर चहुबाजूंनी टीका होत आहे. गुरुवारी (14 मार्च)संध्याकाळच्या सुमारास झालेल्या सीएसएमटी पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून नितेश राणेंनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पेंग्विनकडे विशेष लक्ष आणि नाईट लाईफचा मुद्दा लावून धरण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका का करत नाही?', असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

'पुन्हा तेच आरोप-प्रत्यारोप आणि पुलाचे ऑडिट करण्याच्या घोषणा होतील, पण ठोस उपाययोजना काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेला नागरिकांच्या आयुष्याची काहीच किंमत नाही का?', असा हल्लाबोल करत नितेश राणेंनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला हाणला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरातील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी (14 मार्च)संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेस कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली. या घटनेत तीन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

वाचा अन्य बातम्या

Mumbai Bridge Collapse : सनदशीर मार्ग प्रशासनाला समजत नाही, राज ठाकरेंचं खरमरीत पत्र

'पुतळे बांधण्यासाठी पैसे आहेत पण लोकांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडे वेळ नाही'

'आम्ही डोळ्यासमोर पाहिला मृत्यू, रेड सिग्नल असल्यामुळे मोठा अपघात टळला'

नेमके काय घडले?

सीएसएमटीकडून 'टाईम्स आॅफ इंडिया'कडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळला. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झाहीद खान (वय 32), तपेंद्र सिंग (वय 35), अपूर्वा प्रभू (वय 35 ), रंजना तांबे (वय 40) आणि सारिका कुलकर्णी ( वय 35) यांचा समावेश आहे. या परिसरात संध्याकाळच्या वेळेस अतिशय गर्दी असते. हा पूल कोसळल्यानंतर येथे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. जखमींना जे.जे. हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल आणि सेंट जाॅर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

CSMT जवळ घडलेल्या पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यात जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा करू असंही त्यांनी सांगितलं. घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडून घटनेची माहिती घेतल्याचं सांगत मुख्यमंत्री म्हणाले. काही वर्षांपूर्वी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. त्यात हा पूल सुस्थितीत असल्याचं आढळून आलं होतं. असं असतानाही ही दुर्घटना का घडली हा चिंतेचा विषय आहे.

कसाबचा पूल

मुंबईतला सर्वाधिक महत्त्वाचा आणि अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या CSMT जवळचा एक पूल गुरूवारी रात्री कोसळला. या ब्रिजचं दुसरं नाव आहे कसाबचा पूल . आज हाच पूल मृत्यूचा सापळा बनला.

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. या हल्ल्यातला जिंवत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी कसाबने सीएसटीमध्ये गोळीबार केल्यानंतर तेथून टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीकडे परत येताना या पुलाचा वापर केला होता. या पुलावर त्याचा फोटोही घेतला गेला. अंधाधुंद गोळीबार करून करून तो पुलावरून खाली उतरला आणि टाईम्सच्या एका गल्लीतून कसाब आणि इतर दहशतवादी कामा हॉस्पिटलकडे गेले. त्यामुळे नंतर या पुलाला कसाबचा पूल असंच नाव पडलं.

... तर काहीही करुन तपेंद्रला वाचवलं असतं, भावाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

First published: March 15, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading