महाराष्ट्रातल्या 'राष्ट्रीय मुस्लिम मंचा'चा ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे' म्हणण्यास नकार

महाराष्ट्रातल्या 'राष्ट्रीय मुस्लिम मंचा'चा ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे' म्हणण्यास नकार

'रामाची शपथ घेतली पण मंदिर झालं नाही. त्यामुळं आता खुदाकी कसम कशाला'

  • Share this:

प्रविण मुधोळकर, नागपूर, 5 डिसेंबर : अयोद्घेत राम मंदिर व्हावं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच भाग असणाऱ्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे’ असा  नारा देत शपथ घेण्याचा उपक्रम सुरु केलाय. पण मंचच्या महाराष्ट्रातील शाखेनं हा नारा देण्यास नकार दिलाय.  मंचाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा नारा देणार नसल्याचं जाहीर केले असल्याची माहिती मंचाचे राज्य संयोजक मोहम्मद फारुक शेख यांनी दिलीय

राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या या भूमिकेमुळं अयोद्धेतील  राम मंदिरासाठी मंचाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात उघड फुट पडल्याची चिन्ह आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच एक शाखा असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक आणि संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी अयोद्धेत राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू केला.

डिसेंबर महिन्यात दिल्लीतील रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या  राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या  कार्यक्रमात ‘ कसम खुदाकी खाते है मंदिर वही बनायेंगे’ असा  नारा देत पंचवीस हजार मुस्लिम बांधव रॅलीत सहभागी होणार असल्याचं इंद्रेशकुमार यांनी सांगितलं होतं.

महाराष्ट्रातल्या शाखेने जर वेगळी भूमिका घेतली तर मंचच्या राष्ट्रीय नेतृत्वाला वेगळा विचार करावा लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर बांधण्याच्या फक्त घोषणा दिल्या जातात. मंदिर व्हावं असं आमचं मत आहे मात्र आधी रामाची शपथ घेतली पण मंदिर झालं नाही. त्यामुळं आता खुदाकी कसम कशाला असा सवालही शेख यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 06:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading