16 जानेवारी : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून उस्मानाबादमधून सुरूवात होणार आहे. उस्मानाबादपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. तर समारोप औरंगाबादमध्ये होणार आहे. समारोपाच्या सभेला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर 22 फेब्रुवारीपासून हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रातून सुरू होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादीचे सर्व पहिल्या फळीतील नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप-शिवसेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रीया सुळे या पहिल्या फळीतील सर्व नेते या आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरणात आहेत.
या हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून कर्जमाफीविषयीच्या समस्या त्याचबरोबर बोंड अळीने त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणीही करणार आहे.