मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रपती पोलिस पदकासाठी महाराष्ट्रातील हे 54 पोलिस अधिकारी ठरले मानकरी

राष्ट्रपती पोलिस पदकासाठी महाराष्ट्रातील हे 54 पोलिस अधिकारी ठरले मानकरी

 71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'राष्ट्रपती पोलिस पदक' जाहीर करण्यात आले आहेत.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई,25 जानेवारी: 71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'राष्ट्रपती पोलिस पदक' जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा करण्यात आली आहे. देशातील 1040 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे.

देशातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 93 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील 10 पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहेत. शौर्य पदकासाठी मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

विशिष्ठ सेवा पदकासाठी अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक) मानकरी ठरले आहे. तर गुणवत्ता सेवा पदकासाठी धनंजय कुलकर्णी, नंदकुमार ठाकूर, अतुल पाटील, नंदकिशोर मोरे, स्टीव्हन मॅथ्यूस अॅन्थोनी, निशिकांत भुजबळ, चंद्रशेखर सावंत, मिलिंद तोतरे, सदानंद मानकर, मुकुंद पवार, संभाजी सावंत, गजानन काबदुले, कयुमरेज इराणी, निलिमा अराज, इंद्रजित करळे, गौतम पातरे, सुभाष भुजंग, सुधीर दळवी, किसन गायकवाड, जमील सय्यद, मधुकर चौगुले, भिकन सोनार, राजू आवताडे, शशिकांत लोखंडे, अशफाक अली चिश्तिया, वसंत तराटे, रविंद्र नुल्ले, महेबूबअली सय्यद, साहेबराव राठोड, दशरथ चिंचकर, लक्ष्मण टेंभूर्णे, बटुकलाल पांडे, विष्णू गोसावी, प्रदीप जांभळे, चंद्रकांत पाटील, भानुदास जाधव, नितीन मालाप, रमेश शिंगाटे, बाबुराव बिऱ्हाडे, संजय वायचळे यांची निवड करण्यात आली आहे.

First published:

Tags: 6 police