ठाकरे घराण्याच्या या 'गृहमंत्र्यां'मुळे पूर्ण झालं बाळासाहेबांचं स्वप्न

ठाकरे घराण्याच्या या 'गृहमंत्र्यां'मुळे पूर्ण झालं बाळासाहेबांचं स्वप्न

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता शिवतीर्थावर घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर: महाविकासआघाडीसाठी ऐतिहासिक दिवस आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न अखेर गुरुवारी पूर्ण होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेंचं नाव समोर येण्यामागे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा मोलाचा वाटा आहे. रश्मी ठाकरे ह्या जरी प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय नसल्या तरीही पडद्यामागे उद्धव ठाकरेंसोबत कायमच त्या कार्यरत असतात. शिवसेना कार्यकर्ते आणि आमदार त्यांचा उल्लेख दुसऱ्या माँ साहेब असा करतात. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक राजकीय डावपेचात अथवा प्रत्येक भूमिकेत रश्मी ठाकरेंचा मोठा वाटा असतो.

वाचा-पुन्हा विलंब! त्या एका पत्रासाठी पुन्हा एकदा आमदार अडीच तास ताटकळले

रश्मी या उद्धव ठाकरेंच्या चांगल्या सहचारीणी नाही तर उत्तम मैत्रिण, चांगल्या सल्लागार आणि पत्नी अशा तिन्ही भूमिका निभावत असतात. 2014 रोजी शिवसेना आणि भाजपने वेगळं लढून युती करावी आणि सत्तेत एकत्र यावं यासाठी रश्मी ठाकरेंनी निभावलेली भूमिका महत्त्वाची होती. इतकच नाही तर आताही 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षातील वाद दूर करून युतीत लढण्यासाठी शिवसेना आणि भाजपला एकत्र आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मग असं काय झालं की ही युती तुटली आणि यामगची कारणं काय होती? ही युती तुटण्यामागेही रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात होत आहे.

भाजपने वारंवार सेनेला गोंजरण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिल्यानं शिवसेनं युती तोडली. युती तोडण्याचा सल्ला रश्मी ठाकरेंनी दिल्याचा कयास लावला जात आहे.

30 वर्षांची युती मुख्यमंत्रिपदासाठी तोडण्याचा हट्टही रश्मी ठाकरेंनी केला होता. राजकारणात पुढे काय घडू शकतं याची पूर्व कल्पना त्यांना होती. महायुती तुटल्यानंतर काय घडू शकतं हे त्यांना माहीत होतं. रश्मी ठाकरेंची दूरदृष्टी आणि अचून निर्णय क्षमता यामुळे अखेर महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार आहे. गुरुवारी उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा होणार आहे.

एक उत्तम सल्लागार, अचून निर्णय, राजकारणात योग्य दिशा दाखवणं, दूरदृष्टी चौकस विचार यासगळ्या गोष्टी रश्मी ठाकरे काटोकोरपणे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत पाळतात. रश्मी यांचा उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक निर्णयात मोलाचा वाटा असतो.

वाचा- 'माझं मिशन संपलं आता मी उद्यापासून तुमच्याशी बोलणार नाही'

रश्मी ठाकरेंबद्दल तुम्हाला या खास गोष्टी माहित आहेत का?

रश्मी ठाकरे यांचा जन्म दाभोळचा आहे. मात्र त्यांचं बालपण डोंबिवलीमध्ये गेलं.

13 डिसेंबर 1988 रोजी त्यांचा विवाह उद्धव ठाकरेंसोबत झाला.

घरी आलेल्या प्रत्येकाचं उत्साहानं आणि आदरातिथ्य करून जनमानसाची योग्य नाळ ओळखण्यात त्या माहीर आहेत.

त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करून लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याची रणनिती आखली.

दूरदृष्टी, अचून निर्णय क्षमता आणि उद्धव ठाकरेंसोबत झालेली सल्लामसलत यांमुळे कायमच उद्धव ठाकरेंना यश मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

2010मध्ये कल्याण-डोंबिवली  महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा रश्मी ठाकरेंकडे होती.

त्याचं कोणासोबतही वैर नाही. अगदी विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत रश्मी ठाकरे सगळ्यांनाच अगदी उत्तम पद्धतीनं टॅकल करतात.

वाचा- पुन्हा विलंब! त्या एका पत्रासाठी पुन्हा एकदा आमदार अडीच तास ताटकळले

शांत आणि संयमानं योग्य विचार करून रणनीती आणखं आणि हट्टाला पेटून ती पूर्ण होईपर्यंत चिकाटी न सोडता त्याचा पाठपुरावा करणं हा त्यांचा विशेष गुण आहे.

त्या कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या कानावर आलेल्या प्रत्य़ेक गोष्टी अथवा प्रसंगाचा उलटतपास करून निर्णय घेतात.

उद्धव ठाकरेंबद्दल नकारात्मक बोलेलं त्यांना अजितबात आवडत नाही. त्या स्वत: अत्यंत सकारात्मक विचार करण्याऱ्या दुसऱ्या माँ असा  उल्लेख शिवसेना कार्यकर्ते करतात.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींमागे आणि उद्धव ठाकरेंच्या यशामागे त्यांचा मोलाचा वाचा आहे.

First Published: Nov 27, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading