Home /News /maharashtra /

BREAKING : मुख्यमंत्र्यांच्या घराला कोरोनाचा विळखा, आदित्य यांच्यानंतर रश्मी ठाकरेंनाही झाली लागण

BREAKING : मुख्यमंत्र्यांच्या घराला कोरोनाचा विळखा, आदित्य यांच्यानंतर रश्मी ठाकरेंनाही झाली लागण

Rashmi Thackeray Coronavirus वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन झाल्या आहेत.

    मुंबई, 23 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना'च्या संपादक रशमी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रश्मी ठाकरे यांची सोमवारी रात्री कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या सध्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा विळखा आता मुख्यमंत्र्यांच्या घरालाही पडल्याचं दिसत आहे. दरम्यान, काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशभरात कमी झाला होता. मात्र आता पुन्हा या व्हायरसने डोकं वर काढलं असून महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा कडक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या