मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाण्याहून निघाल्यानंतर रश्मी ठाकरेंचा भांडूपला हॉल्ट, थांबून काय केलं? पाहा VIDEO

ठाण्याहून निघाल्यानंतर रश्मी ठाकरेंचा भांडूपला हॉल्ट, थांबून काय केलं? पाहा VIDEO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होत्या. ठाण्याहून मातोश्रीवर परतत असताना रश्मी ठाकरे यांनी भांडूपमध्ये हॉल्ट घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होत्या. ठाण्याहून मातोश्रीवर परतत असताना रश्मी ठाकरे यांनी भांडूपमध्ये हॉल्ट घेतला. भांडूपमधल्या संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी रश्मी ठाकरे गेल्या. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

संजय राऊत यांच्या घरी देखील नवरात्र उत्सव साजरा केला जातो, त्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि राऊत कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रश्मी ठाकरे या राऊतांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी पोहोचल्या. संजय राऊत यांच्यावर अटकेची कार्यवाही झाल्यानंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे या त्यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत. एकंदरीत संजय राऊत हे सध्या कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी राऊतांच्या कुटुंबीयांना दिला.

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी इडीने संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. दरम्यान संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील संजय राऊत यांच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरेंनीही राऊत कुटुंबियांना धीर दिला होता.

रश्मी ठाकरे या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आल्या होत्या. रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी मोठ्याप्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे यांना देवीकडे काय मागणे मागितले? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सर्वांना सुखी ठेव, असं उत्तर दिलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रश्मी ठाकरे यांच्या टेंभीनाका देवीच्या दर्शनाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा यावर मी फार बोलणार नाही, देवीचं दर्शन घेण्यावर कुणालाही बंदी नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

First published:

Tags: Sanjay raut, Shivsena