मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Rashmi Thackeray Health Update: रश्मी ठाकरेसुद्धा रुग्णालयात; आठवड्याभरापूर्वी झाला होता कोरोना

Rashmi Thackeray Health Update: रश्मी ठाकरेसुद्धा रुग्णालयात; आठवड्याभरापूर्वी झाला होता कोरोना

23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली.

23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली.

23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली.

    मुंबई, 30 मार्च: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray corona positive) यांना कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात (CM Uddhav thackeray wife rashmi in hospital)दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतके दिवस त्या घरीच विलगीकरणात (Home isolation) होत्या. पण मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

    गेल्या आठवड्यात 23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रश्मी ठाकरे यांनी थोडे दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा घेतली होती.

    रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

    दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनासुद्धा मंगळवारी संध्याकाळी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार (Sharad pawar) यांना गेले दोन दिवस पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे तपासणी करण्यात आली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रस्क्रिया होणार असल्याची बातमी आहे.

    रश्मी ठाकरे यांना नेमक्या कुठल्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याबाबत अजून अधिकृतपणे माहिती समजलेली नाही.

    First published:

    Tags: Breaking News, Uddhav thackeray