Home /News /maharashtra /

औरंगाबादकरांनो, आता विनाकारण घराबाहेर पडू नका! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

औरंगाबादकरांनो, आता विनाकारण घराबाहेर पडू नका! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

औरंगाबादमध्ये कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सगळे उपाय प्रशासनाने केले मात्र, ही साखळी खंडित होऊ शकली नाही.

    औरंगाबाद, 16 मे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक पाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1000 च्या घरात पोहोचण्याची भीती आहे. सर्व उपाय योजना करूनही कोरोनाची साखळी तोडता आला नाही. त्यामुळे आता प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. औरंगाबादमध्ये कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सगळे उपाय प्रशासनाने केले मात्र, ही साखळी खंडित होऊ शकली नाही. आतापर्यंत शहरात 100 टक्के लॉकडाउनचा पर्याय प्रशासन वापरला होता. यामध्ये फक्त दवाखाने आणि औषध विक्रीच सुरू आहे. परंतु, तरीही नागरिकांचा वावर रस्त्यावर दिसतच आहे. हेही वाचा -संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पोलिसांना सांगितलं पत्नीचा मृत्यू झाला पण खरं कारण.. औरंगाबाद शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर लोकांची गर्दी वाढतच चालली आहे. अखेर पोलिसांनीही औरंगाबादकरांपुढे हात टेकले आहे. आता शहराच्या बंदोबस्तात जलद कृती दल रस्त्यावर उतरवले आहे. शहरातील ज्या भागात कोरोना पोझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्या भागात आज जलद कृती दलाने संचलन केले आहे. आता घराबाहेर विनाकारण कुणी बाहेर आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 872(दुपारी 1 वाजेपर्यंत) पर्यंत पोहचली आहे आणि सायंकाळपर्यंत हा नक्की वाढू शकतो. हेही वाचा -भाजपकडून आमदारकी मिळाल्यानंतर शरद पवारांविषयी रणजीतसिंह मोहिते पाटील म्हणाले.... औरंगाबादमध्ये सीआरपीएफची एक कंपनी सुद्धा पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या आकडा रोखण्यात यश आले नाही तर औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस ताकद वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  आज सकाळी 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले दरम्यान, औरंगाबाद शहरात आज 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 872 झाली असल्याचे  जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.  शहरात  एमजीएम मेडिकल कॉलेज (3),  हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिन्सी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1)  या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या