Home /News /maharashtra /

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता खैर नाही, अखेर या शहरात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता खैर नाही, अखेर या शहरात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात

जमावबंदी लागू असताना नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

ठाणे, 28 मे: ठाण्यातील मुंब्रा येथे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडला आहे. जमावबंदी लागू असताना नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर उपाययोजना म्हणून अखेर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आलं आहे. रॅपिड अ‍ॅक्शनच्या जवानांनी शहरातून रुट मार्च काढला असून आता मुंब्रा शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची खैर नाही, हाच संदेश देण्यात आला. हेही वाचा.. लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला 9 ते 12 महिने लागतील, नवा अहवाल आला समोर 3 अधिकारी आणि 50 जवान असा रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा ताफा असून मुंब्रा येथील नागरीकांना वारंवार सांगून देखील नागरीक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यामुळे आता मुंब्रा येथे थेट रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहे. मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी या मार्चचे नेतृत्व केलं. याआधी विविध प्रकारे मुंब्रातील नागरीकांना मुंब्रा पोलिसांनी घरातच राहण्याची विनंती केली होती मात्र तरीही नागरीक विनाकारण बाहेर फिरतच होते. याचाच परिणाम म्हणुन मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी आणि पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते तर संपूर्ण मुंब्रा शहरात तब्बल 312 नागरीक कोरोनाबाधित आढळले आहेत. तरीही मुंब्रातील परिस्थिती काही बदलत नव्हती यामुळे आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांना मुंब्रा येथेपाचारण केलं गेलं आहे. हेही वाचा.. मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या