मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलडाणा हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिन्याभरापासून बलात्कार

बुलडाणा हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिन्याभरापासून बलात्कार

 पीडितेवर कित्येक महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. या नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.

पीडितेवर कित्येक महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. या नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.

पीडितेवर कित्येक महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. या नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.

  • Published by:  sachin Salve
बुलडाणा, 17 ऑक्टोबर : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील मलकापूरमध्ये (mlakapur) एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची (minor girl rape) घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरात ही घटना घडली आहे. पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर  28 वर्षीय तरुणाने अत्याचार केला आहे. भूषण गजानन बोरसे असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. Good News : मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; आज एकही कोरोना मृत्यू नाही सदर आरोपी मलकापूर येथील  मताम्हाकली नगरातील रहिवासी आहे.  आरोपी भूषण बोरसे हा पीडित मुलीला ब्लॅकमेल करून अत्याचार करत होता. पीडितेवर कित्येक महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. या नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. तसंच परिवारातील सदस्यांना मारून टाकण्याच्या अल्पवयीन मुलीला सतत धमक्या देत होता. सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून कोणीच देऊ शकत नाही 'डायमंड', हे आहे कारण.. अखेर पीडितेनं आणि तिच्या कुटुंबीयांनी मलकापूर पोलिसांमध्ये धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपी भूषण बोरसेला अटक केली आहे.  मलकापूर शहर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस करत आहे. मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग तर दुसरीकडे, गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) परिसरात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग (minog girl molestation) केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.

T20 World Cup : पहिल्याच सामन्यात Oman चा धमाका, PNG ला 10 विकेटने लोळवलं!

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील शाळेत पीडित विद्यार्थीनी पाचवीच्या इयत्तेत शिक्षण गेते. पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षीय विध्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी मुख्याध्यापक राजेंद्र भोईर (वय 56) याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने पडघा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही तक्रार दाखल होताच पडघा पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. आरोपी भोईर हा एक वर्षाने सेवानिवृत्त होणार होता.
First published:

पुढील बातम्या