मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

घरात घुसून नराधमाने केला बलात्कार, धक्क्यातून पीडितेनं विष पिऊन संपवलं जीवन

घरात घुसून नराधमाने केला बलात्कार, धक्क्यातून पीडितेनं विष पिऊन संपवलं जीवन


ही  घटना परळी तालुक्यातील गोपाळपुर इथं घडली. या प्रकरणाने खळबळ उडाली

ही घटना परळी तालुक्यातील गोपाळपुर इथं घडली. या प्रकरणाने खळबळ उडाली

ही घटना परळी तालुक्यातील गोपाळपुर इथं घडली. या प्रकरणाने खळबळ उडाली

परळी, 25 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील परळीमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. या घटनेमुळे मनस्ताप आणि अपमानातून या महिलेनं विष प्राशन करून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही  घटना परळी तालुक्यातील गोपाळपुर इथं घडली. या प्रकरणाने खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी  माउली लक्ष्मण नवघरे याने या महिलेचा पती बाहेरगावी राहतो याचा गैरफायदा घेऊन रात्री   घरात घुसून बळजबरीने शारीरिक अत्याचार केले होते. या घटनेमुळे मनस्ताप आणि आपमान सहन न झाल्याने  पीडित विवाहितेनं विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

या प्रकरणी आरोपी माउली लक्ष्मण नवघरेविरुद्ध ३६ / २०२० कलम ३७६, ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात भोंदू बाबाकडून 5 महिलांचं लैंगिक शोषण, पूजेच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना केलं नग्न

दरम्यान,   पिंपरी चिंचवडमध्ये पुजेच्या नावाखाळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरावर लिंबू पिळून चोळणं असं धक्कादायक प्रकार तो करायचे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घरात गुप्तधन असल्याचं आणि मुलगा होणासाठी अघोरी पुजा करायला लागेल असं सांगून भोंदू बाबाकडून एकाच घरातील पाच महिलांच लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सोमनाथ चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींच्या योनीमार्गात सुपारी ठेऊन त्यांना कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा खुलासाही पोलीस तपासात करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाकडून 3 लाख 11 हजार रूपये अघोरी पूजेच्या नावाखाली उकळले आहेत. तुमच्या घरातमध्ये पुत्रप्रात्पी होऊ नये यासाठी तुमच्याच एका नात्यातील बाईने करणी केली आहे, असं सांगून पीडित कुटुंबियांना भूरळ पाडली.

इतकंच नाही तर तुमच्या घराच्या एका खोलीमध्ये गुप्तधन आहे. त्यामध्ये आत 7 पेट्या धन, एक सोन्याची घागर आणि एक गणपतीची मुर्ती असा खजिना असल्याचं सांगितलं. तुमच्या घरातील मनाली नावाच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला पूत्र हवा असेल, मनालीचा जीव वाचवायचा असेल आणि खजिना हवा असेल तर घरात उतारा टाकावा लागेल आणि नग्न पुजा करावी लागेल असं या नराधम भोंदू बाबाने पीडित कुटुंबियांना सांगितलं.

या सगळ्या विधीसाठी 3 लाख खर्च आणि माझी 11 हजार रुपये दक्षिणा द्यावी लागले. पुढच्या 15 दिवसांत उतारा टाकला नाही तर घरातील सदस्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत आरोपी सोमनाथ चव्हाणने कुटुंबाला घाबरवलं. अशा प्रकार अंधश्रद्धेची भीती घातल्यामुळे कुटुंबीय अघोरी विद्या करण्यासाठी तयार झाले.

पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी घरातील सोनं विकलं आणि आरोपी सोमनाथला पैसे दिले. त्यानंतर 20 दिवसांनी घरी येत सोमनाथने एक काळी कोंबडी, बाहुल्या, टाचण्या, पांढरे कापड, मीठ, लिंबू, कोहळा आणि खूप सामान घेऊन आला. त्यानंतर त्याने प्रत्येकावर उतारा टाकण्यास सुरुवात केली. सगळ्यांच्या अंगावरील कपडे त्याने काढून स्वत:कडे ठेवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ चव्हाणने कुटुंबातील एका तरुणीशी लग्न केल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर महिलांना नग्न करून त्यांच्या छातीवर लिंबाचा रस चोळयचा. त्यानंतर त्यांच्या योनीला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करत जिभेने चाटायचा असंशी माहितीही पीडितेने पोलिसांना दिली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण आहे.

First published:

Tags: Beed, Beed crime news, Crime