मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, नागपुरातला खळबळजनक प्रकार

नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, नागपुरातला खळबळजनक प्रकार

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत एका तरुणानं तरुणीवर बलात्कार (Rape in Nagpur) केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे.

नागपूर, 23 मे : नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत एका तरुणानं तरुणीवर बलात्कार (Rape in Nagpur) केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. संबंधित पीडित मुलगी गेल्या कित्येक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होती. याचाच गैरफायदा घेत तरुणानं तिला आपल्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले आणि नंतर नोकरीही नाही आणि लग्न करण्यासही नकार देत मुलीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात शुभम जगदीश हुड (वय 28) रा. दिघोरी, उमरेड रस्ता याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित पीडित तरुणीचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. ती नोकरीच्या शोधात होती. अशातच तिची नोव्हेंबर 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून शुभम नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. फेसबुकवरून त्यांच्या संवाद होत गेला. त्यानंतर त्यांनी ऐकमेकांना आपले मोबाईल क्रमांक देऊन आपसात बोलू लागले. या दरम्यान शुभमनं तिला वागधरा (ता. हिंगणा) येथील कोयो फिंगर फ्रेमिंग हेल्थ रिसो या कंपनीत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. शुभम तिला कंपनी दाखवण्यासाठीही घेऊन गेला होता. त्यावेळी त्यानं आता या कंपनीचं काम चालून असून लवकरच इथं कामाला सुरूवात होईल असंही सांगितलं. पीडित तरूणींनंही भाबडेपणांन त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मग त्यांची आणखीन चांगलीच ओळख वाढली, त्यातून त्यांच कथित प्रेम जुळलं. या काळात शुभमनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तिला वागधरा येथील कंपनीत नेऊन तिचे शारीरिक शोषण केलं. आज ना उद्या नोकरी लागेल या आशेवर इच्छा नसताना तरुणी हा अत्याचार सहन करीत होती.

हे वाचा - दारात लग्नाची तयारी, नवरीने मात्र दुसऱ्या तरुणाचा हात धरून गाठलं पोलीस स्टेशन

दोन वर्षे झाली तरी तिला नोकरी लावून न दिल्यानं तरूणीनं त्याच्यामागे मग लग्नासाठी तगादा लावला. त्यावर त्यानं थेट आपण लग्न करू शकत नाही, असं म्हणत मुलाने लग्नास नकार दिला. त्याचप्रमाणे तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीनं पोलिसांशी संपर्क साधाला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी शुभमला अटक केली.

First published:

Tags: Nagpur, Rape case, Rape news