Home /News /maharashtra /

कोल्हापुरात मुलीवर 3 वेळा सामूहिक बलात्कार, डोळ्यात स्पे मारून केलं अपहरण

कोल्हापुरात मुलीवर 3 वेळा सामूहिक बलात्कार, डोळ्यात स्पे मारून केलं अपहरण

विरोध करत असताना जबरदस्तीने तीन वेळा अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

कोल्हापूर, 01 जानेवारी : आज जगभरात नव्या वर्षाचं जोरदार स्वागत होत असताना कोल्हापुरात बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गारगोटीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुलीच्या डोळ्यांत स्पे मारून तिला मोटारसायकलवर बसवून जबरदस्तीने तिला पळवून नेत नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. विरोध करत असताना जबरदस्तीने तीन वेळा अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. मुलीच्या डोळ्यात स्प्रे मारून तिला मोटारसायकलवरून जबरदस्तीने पळवले आणि अत्याचार केल्याचं पीडितेने म्हटलं आहे. आरोपी सचिन शिंदे आणि अन्य एकाविरोधात पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांचाय कसून तपास घेण्याचं काम पोलीस करत आहेत. दरम्यान, पीडित तरुणीची सुरक्षेसाठी वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. नवऱ्याशी वाद घालून ती आली होती मुंबईत, नोकरीचे आमिष दाखवून वयोवृद्ध व्यक्तीने केला बलात्कार महाराष्ट्रीची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हातावर पोट असणाऱ्या तरुणीवर नोकरीचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान बलात्कार करणाऱ्या 60 वर्षीय नराधमाला पोलिसांनी वांद्रा इथल्या परिसरातून राहत्या घरातून अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 60 वर्षीय आरोपी सलीम जावेरी वांद्र्यातील आपल्या घरी पीडित महिलेवर 15 दिवसांपासून बलात्कार करत होता. पीडितेच्या शरीरातून रक्त येण्यास सुरुवात झाल्यानंतर सलीमने भाभा रुग्णालयात पीडितेला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी हा सगळ्या प्रकार उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नराधमाला सोमवारी रात्री उशिरा वांद्रा इथल्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. इतर बातम्या - दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण, 2 महिन्यांची लेक पोरकी पीडित महिला उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आपल्या पतीसोबत भांडून तिने घर सोडलं आणि मुंबई गाठली. मुंबईमध्ये छोटी-मोठी कामं करून पैसे मिळवण्याचं तिचं स्वप्न होतं. एक दिवस बस स्टॉपवर पीडित महिला उभी असताना 60 वर्षीय आरोपीने तिला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. स्वयंपाक आणि काम करण्याची नोकरी देतो असं सांगून त्याने स्वत:च्या घरी नेलं. तिथे गेल्यानंतर नराधमाने तिला डांबून तिच्यावर 15 दिवस बलात्कार करत राहिला. बांद्रा इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण घटनेची माहिती भाभा रुग्णालयातून मिळाली. 60 वर्षीय आरोपी सलीम जावेरीची पत्नी त्याला 20 वर्षांपूर्वीच सोडून अमेरिकेला गेली. त्यामुळे सलीम जावेरी इथे वांद्रात एकटाच रहात होता. आरोपीविरोधात पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा अंतर्गत सोमवारी रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. इतर बातम्या - निर्भया प्रकरणात चारही आरोपींना एकाच वेळी देणार फाशी, तिहारमध्ये अशी केली तयारी
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Rape case

पुढील बातम्या