तोंडावर टॉवेल टाकून अल्पवयीन मुलीला पळवलं, नराधमाकडून शेतात बलात्कार

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी आरोपी नराधमाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 10:36 AM IST

तोंडावर टॉवेल टाकून अल्पवयीन मुलीला पळवलं, नराधमाकडून शेतात बलात्कार

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी

सोलापूर, 23 सप्टेंबर : शाळकरी मुलीवर बलात्कार झाला असल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. मंगळवेढा तालुक्यातील डोणज इथला हा संतापजनक प्रकार आहे. अल्पवयीन मुलीला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी आरोपी नराधमाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोणज इथल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर आत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रामणणा शिवशंकर केदार अशा आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीला न्यालयाने 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील डोणज इथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने तीव्र निषेध वक्त केला जात आहे.

इतर बातम्या - रत्नागिरी: राष्ट्रवादी शिवसेनेला करणार 'चेकमेट'; रिंगणात आणणार तगडा उमेदवार

खेडवर इथल्या चिदानंद स्वामी यांच्या शेतात सायंकाळी 5 दरम्यान  शाळकरी मुलगी (वय 15) ही शाळेतून घरी जाताना नराधाम रामणणा केदार याने पाठीमागून टॉवेल टाकून तिला शेतातील ऊसामधे ओढत नेलं. तिने विरोध केल्यामुळे तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने  पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपीवर 363,323 बाललैंगिक अत्याचार कायदे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Loading...

इतर बातम्या - 'पुतण्याला बक्षिस देण्यासाठी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं'

दरम्यान, पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

VIDEO: 26 सप्टेंबरपासून 5 दिवस बँका बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...