9 महिन्याच्या गर्भवतीवर केला बलात्कार, आरोपीला शेजारच्या महिलेनेही दिली साथ

9 महिन्याच्या गर्भवतीवर केला बलात्कार, आरोपीला शेजारच्या महिलेनेही दिली साथ

तुझ्या पोटावर मी लाथ मारेन अशी धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. बरं इतकंच नाही तर पीडितेच्या पतीलाही जबर मारहाण केली.

  • Share this:

प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 03 डिसेंबर : मुख्यमंत्र्यांचं नागपूर पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरलं आहे. नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भेंडे ले-आऊटमधील ही माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.

9 महिन्याच्या गर्भवतीवर शेजाऱ्याने बलात्कार केला आहे. यात गर्भवती महिला ही  20 वर्षांची होती.  छोटू उर्फ मद्रासी मेश्राम असं आरोपीचं नाव आहे. छोटू हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. सगळ्यात धक्कादायक म्हणजे शेजारी राहणाऱ्या मीराबाई या महिलेच्या घरी तिच्याच मदतीने आरोपीने गर्भवतीवर बलात्कार केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

महिला गर्भवती होती. त्यामुळे तुझ्या पोटावर मी लाथ मारेन अशी धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. बरं इतकंच नाही तर पीडितेच्या पतीलाही जबर मारहाण केली. या घटनेचा बोबाटा होताच आरोपीने पळ काढला पण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, महिलेच बाळ आणि महिला सुखरूप आहेत. तिच्यावर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणात तपास करत आहेत.

तर रविवारी असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरात घडला. रेल्वे स्थानकावरून महिलेचं अपहरण करून बलात्कार केल्याची घटना घडली होती. पीडित महिला ही नोकरीसाठी त्रिपुराहून नागपूरमध्ये आली होती. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत असताना हा प्रकार समोर आला.

महिला रेल्वे स्थानकावर एकटी असल्याचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीनं या महिलेचं अपहण केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अजूनही आरोपीचा शोध लागू शकला नाही.

त्रिपुरा राज्यातील महिला चार महिन्यांपूर्वी नोकरीसाठी कोईबतूर येथे आली होती. आता त्रिपुरा राज्यात परत जात असताना नागपूर रेल्वे स्थानकावर तिच्यासोबत हा प्रसंग घडला आहे.

रेल्वे स्थानकासारख्या ठिकाणाहून महिलेचं अपहरण केलं गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर असलेल्या नागपुरात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच नागपुरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या राज्यातील एका महिलेवर बलात्कार झाल्याने पुन्हा एकदा नागपूरमधील महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्री असणारे फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत. अशात त्यांच्याच शहरातून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. असे गुन्हे घडू नये, म्हणून येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काही ठोस कारवाई करतात का, हे पाहावं लागेल.

VIDEO भयानक : मुक्या जनावरावर केले त्यानं चाकूने सपासप वार

First published: December 3, 2018, 9:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading