अल्पवयीन मुलीला दीड महिना घरात डांबून केला अनेकदा बलात्कार

अल्पवयीन मुलीला दीड महिना घरात डांबून केला अनेकदा बलात्कार

लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला घरात डांबून तिच्यावर दीड महिन्यात अनेकदा बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 20 जून- लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला घरात डांबून तिच्यावर दीड महिन्यात अनेकदा बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विक्रमनगरात ही घटना घडली असून किरण शाहू काळे (वय- 22, रा. ख्रिश्‍चन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. 30 एप्रिल ते 15 जून 2019 या काळात नराधमाने मुलीवर अनेकदा बलात्कार केला. आरोपीसह रोहित शाहू काळे, शाहू शंकर काळे, गीता शाहू काळे, दीपाली शाहू काळे, श्रुती शाहू काळे या सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

पीडित मुलगी पन्हाळा तालुक्यातील असून ती कोल्हापूर येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपी किरण काळे याच्याशी तिची ओळख झाली होती. कोल्हापूर येथील आजोबांकडे जाते, असे सांगून 30 एप्रिल 2019 रोजी ती बाहेर पडली होती. रात्री उशीर झाला तरी ती घरी परत न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला. तब्बल दीड महिन्यानंतर मुलगी विक्रमनगरात असल्याची माहिती पालकांना मिळाली. किरण काळे याने मुलीला लग्नाचं आमिष दाखवून घरात डांबून ठेवल्याचे पालकांना समजले. त्यांनी थेट आरोपीचे घर गाठले. परंतु, आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी मुलीला भेटू दिले नाही.पालकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ केली. अखेर पालकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासूरकर यांच्याशी संपर्क साधला. गीता हासूरकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर मुलीची सूटका करण्यात आली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

VIDEO: नाशिकमध्ये गुंडगिरी, कॉलेजच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

First published: June 20, 2019, 4:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading