शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन नाशकात विवाहितेवर बलात्कार, मोबाइलमध्ये केले चित्रिकरण

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन नाशकात विवाहितेवर बलात्कार, मोबाइलमध्ये केले चित्रिकरण

नराधमाने मोबाइलमध्ये अश्लिल चित्रिकरण करून तिला बदनामीची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल केले.

  • Share this:

नाशिक,23 डिसेंबर:आदिवासी भागातील सुरगाणा येथे 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असताना विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. विवाहितेला भेटण्याचा बहाणा करत तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एवढेच नाही तर नराधमाने मोबाइलमध्ये अश्लिल चित्रिकरण करून तिला बदनामीची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बाळू गिरीधर जाधव या संशयितावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मार्च ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत ओळखीचा संशयित बाळू जाधव याने भेटण्याचा बहाणा करत पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये नेले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. शुद्ध आली तेव्हा हॉटेलमध्ये संशयिताने बलात्कार केल्याचे समजले. याबाबत जाब विचारला असता संशयिताने हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये चित्रित केल्याचे सांगितले. नकार दिला अथवा कुणाला काही सांगितले तर नातेवाईक, पतीला हे चित्रीकरण पाठवण्याची धमकी देत परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. मोबाइल चित्रिकरण डिलिट करण्यासाठी वेळोवेळी पैसे घेतले. याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पीडितेने सांगितल्यानंतर संशयिताने तुझा संसार मोडून समाजात बदनामी करतो, अशी धमकी दिली. वेळोवेळी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ होत असल्याने पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताच्या विरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतिमंद मुलीवर चौघांनी केला रात्रभर बलात्कार..

आदिवासी भागातील सुरगाणा येथे 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार खुटविहिर गावात गेल्या आठवड्यात घडला होता. सुरगाणा पोलिसांनी चारही नराधमांना अटक केली आहे. दीपक काशीराम पवार, दीपक आनंद पवार, सुरेश शिवराम शेवरे आणि अशोक उणाजी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी मध्यरात्री संशयित आरोपींनी मुलीस फसू लावून गावातील निर्जन स्थळी शेतावर नेले. येथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. रात्रभर संशयित तिच्यावर अत्याचार करत होते. सकाळी बहिणीने तिला रात्रभर कुठे होती याबाबत विचारले असता तिने हात इशाऱ्याने घडलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीला संशय आल्यानंतर तिने बहिणीला पाहिले असता तिच्यावर पाशवी व अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समजले. बहिणीला घेऊन तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयितांचा शोध घेत त्यांना मोहपाडा, मालगोंदा, भाकुर्डी येथे अटक केली. दरम्यान, यापूर्वी आरोपींनी इतर कुणावर अत्याचार केले का, याचा तपास पोलिस करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 23, 2019, 12:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading